Subscribe Us

header ads

तुळजापुराला ज्योत आणण्यासाठी जाणार्‍या आरोग्यसेवक आणि उपसरपंच यांचा अपघातात मृत्यू

बीड स्पीड न्यूज 

तुळजापुराला ज्योत आणण्यासाठी जाणार्‍या आरोग्यसेवक आणि उपसरपंच यांचा अपघातात मृत्यू

बीड | नवरात्र उत्सवानिमित्त  तुळजापूरच्या देवीची ज्योत आणण्यासाठी मोटर सायकल वर जात असलेल्या आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील दोन युवकांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. नवरात्र उत्सवानिमित्त सांगवी पाटण येथे तुळजापुरच्या  देवीची ज्योत आणण्याची प्रथा आहे. सोमवारी घटस्थापना असल्याने गावातील तरुण भाविक शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास दुचाकी टेम्पो पिकप अशा वाहनातून ज्योत आणण्यासाठी तुळजापूरकडे रवाना झाले. या भाविकांमधील ( महेश भोसले वय 31 वर्ष ) ( अमोल खिलारे वय 38 वर्ष )  हे दोघे जण दुचाकीवरून निघाले होते. दरम्यान शनिवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास येरमाळाजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात भोसले आणि खिलारे  या दोघांचा जागीच मृत्यू झाला. महेश भोसले हा आरोग्यसेवक तर अमोल खिलारे उपसरपंच होते. दोन तरुणांच्या अपघाती निधनाने गावावर शोककळा पसरली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा