Subscribe Us

header ads

जागतिक पर्यटन दिनानिमित्त बीड मध्ये हेरिटेज वॉकचे आयोजन

बीड स्पीड न्यूज 


जागतिक पर्यटन दिनानिमित्त बीड मध्ये हेरिटेज वॉकचे आयोजन



बीड | प्रतिनिधी-: जागतिक पर्यटन दिनानिमित्त
उपसंचालक पर्यटन विभाग औरंगाबाद ,पुरातत्व विभाग महाराष्र्ट शासन औरंगाबाद, इतिहास संकलन समिती (संस्था) महाराष्र्ट प्रांत यांच्या संयुक्त विद्यमानाने दि 27/9/2022  मंगळवार रोजी हेरीटेज वॉकचे आयोजन बीड येथील  कंकालेश्वर मंदिर येथे करण्यात आले आहे.यावेळी डॉ श्रीमंत हारकर उपसंचालक पर्यटन विभाग  मा अमोल गोटे सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग , मा डॉ राधाकृष्ण जोशी प्रांताध्यक्ष  इतिहास संकलन संस्था महाराष्र्ट मा. डॉ मुकुंद देवर्षी  प्राचार्य खोलेश्वर महाविद्यालय अंबाजोगाई  पर्यटन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत प्रा डॉ शांता जाधवर गिते यांचे कंकालेश्वर मंदिर  माहीती देणार आहेत. या कार्यक्रमाची वेळ सकाळी 11.00वा  ठिकाण  कंकालेश्वर मंदिर  बीड आहे. बीड जिल्ह्यातील सर्व  इतिहास प्रेमी अभ्यासक, प्राध्यापक  शिक्षक विद्यार्थी यानी उपस्थित रहावे. असे अवाहन  इतिहास संकलन संस्था पदाधिकारी  मार्गदर्शक प्रमोदराव कुलकर्णी   नंदकिशोर झरीकर, प्रा डॉ व्यंकटेश लांब प्रा डॉ रवी सातभाई  प्रा शशिकांत पसारकर उमेश, मा. जगताप प्रा शांता गिते आदीनी केले आहे. वरील माहीती डॉ राधाकृष्ण जोशी यानी दिली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा