Subscribe Us

header ads

बीड जिल्हा रुग्णालयात सिझर झालेल्या महिलेचा मृत्यू!

बीड स्पीड न्यूज 


बीड जिल्हा रुग्णालयात सिझर झालेल्या महिलेचा मृत्यू!

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिला दगावल्याचा महिलेच्या नातेवाईकांनी केला आरोप 

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. साबळे यांनी दिले चौकशीचे आदेश 

बीड | प्रतिनिधी -: पाटोदा तालुक्यातील महिलेला बीड जिल्हा शासकीय रूग्णालयात भरती करण्यात आले होते. सदरील महिलेचे सिझर करण्यात आले. मात्र या महिलेची तब्येत बिघडल्याने तिला खाजगी रूग्णालयात भरती करण्यात आले. सदरील महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. शासकीय जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिला दगावल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. नातेवाईकांनी आरोप केल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. साबळे यांनी चौकशीचे आदेश दिले. पाटोदा तालुक्यातील सिमा अजय मांजरे (वय २५) या महिलेला प्रसुतीसाठी ४ सप्टेंबरला जिल्हा शासकीय रूग्णालयात भरती करण्यात आले. दुसऱ्या दिवशी सदरील महिलेचे सिझर करण्यात आले. तीन दिवसानंतर या महिलेला जिल्हा शासकीय रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली. मात्र अचानक १० सप्टेंबरला या महिलेची प्रकृती बिघडल्याने खाजगी रुग्णालयात महिलेला भरती करण्यात आले. सदरील महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला इन्फेक्शन झाल्याने त्याचा मृत्यू झाला असा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला डॉक्टरांविरूध्द कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. साबळे यांनी चौकशीचे आदेश दिले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा