Subscribe Us

header ads

आम आदमी पार्टीचा खड्डा तिथे फुल दवंडी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

बीड स्पीड न्यूज 

आम आदमी पार्टीचा खड्डा तिथे फुल दवंडी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला   

त्यामध्ये रिक्षा चालकांचा व रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता

बीड |  प्रतिनिधी-: बीड शहरातील खराब होत असलेल्या रस्त्यांच्या दुरावस्थेने नागरिकांना होत असलेल्या त्रासाने त्रस्त होत आहेत बीड शहरातील नगर रोड, चह्राटा रोड, अंकुश नगर रोड, धानोरा रोड, संत नामदेव नगर , पिंपर गव्हाण रोड, बार्शी रोड, जालना रोड, सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येणारे रस्ते यांची दुरावस्था आहे वेळेवर ठीक न केल्यामुळेआम आदमी पार्टीच्या वतीने मोर्चा. आज खड्डा तिथे फुल दांडी वाजवून मोर्चा काढण्यात आला या अगोदर देखील या खड्ड्यांकरिता 16/09/21 नगर रोड वरील खड्डे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पोलीस पेट्रोल पंप सतराशे सत्तावीस खड्डे गणना आंदोलन.12/09/2022 आम आदमी पार्टीचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन व मोर्चाचा इशारा देण्यात आला होता. आपणास निवेदन देण्यात आले होते की बीड शहरातील मुख्य रस्ते असणारे नगर रोड, धानोरा रोड, चह्राटा रोड, अंकुश नगर रोड, बार्शी रोड, पांगरी रोड, पिपरगव्हाण रोड, राजीव गांधी चौक ते आदित्य नगरी रोड, बार्शी रोड, जालना रोड, या विषयाला घेऊन आम आदमी पार्टी बीड पाठीमागील एक ते दीड वर्षापासून आपणास बीड शहरातील मुख्य रस्ते असणारे  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत नगरपालिकेच्या अंतर्गत जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येत आहेत. या रस्त्यांची खूप दूर अवस्था झालेली आहे या रस्त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना खूप जास्त त्रास सहन करावा लागत आहे. वृद्ध नागरिक पेशंट शाळकरी मुले मुली सर्वसामान्य नागरिकांना दळणवळणासाठी होत असलेल्या अडचणी प्रशासन शासन जनप्रतिनिधी कसल्याही प्रकारची येथील नागरिकांची दखल घेताना करताना दिसत नाहीत या खड्डे पडलेल्या रस्त्यामुळे नागरिकांना मोठमोठ्या अपघातास सामोरे जावे लागत आहे. यामुळे नागरिक मणक्याचे आजार मानसिक त्रास आरोग्य धोक्यात असल्या मुळे सर्व नागरिक खूप मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत आम आदमी पार्टी या विषयाला घेऊन वारंवार निवेदने आंदोलने केली परंतु आपण कसल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही ज्या प्रमाणे घ्यायला पाहिजे होती ती घेतलेली नाही या विषयास घेऊन आम आदमी पार्टी यांच्या वतीने 19 सप्टेंबर 2022 ला जर आठ दिवसाच्या आत या रस्त्यांवरती योग्य ते काम करताना दिसले नाही तर बीड शहरातील रिक्षा चालक सामान्य नागरिक वाहतूकदार ग्रस्त नागरिकांना सोबत घेऊन मोर्चा काढणार असा इशारा देऊन देखील प्रत्यक्षात कसल्याही प्रकारचे काम होताना दिसले नाही म्हणून आज आपल्या कार्यालयावरती दवंडी मोर्चा घेऊन आलो आहोत आपण याची योग्य ती दखल घ्यावी सर्वस्व जबाबदारी हा मोर्चा खड्डा तेथे फुल व दवंडी वाजून काढण्यात आला आहे मार्ग पवनसुत मंगल कार्यालय पासून सुरू झाला आज दिनांक 19/ 09/ 2022 रोजी सोमवार या दिवशी सकाळी अकरा वाजता सुरू झाला जिल्हा अधिकारी कार्यालय बीड यावर काढण्यात आला या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सामान्य नागरिक आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी बीड शहरातील रिक्षा युनियन मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या यानंतरही लवकरात लवकर जर दखल घेतली नाही तर पुढील आंदोलने हे तीव्र असतील अशी नागरिकांची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. याची सर्वस्व जबाबदारी ही प्रशासनाची असेल यावेळी आम आदमी पार्टीचे माजी सैनिक अशोक येडे, जिल्हाध्यक्ष आप रिक्षा युनियनचे जिल्हाध्यक्ष मा. अमोल शिंदे अक्रम, शेख जिल्हा उपाध्यक्ष रामधन जमले, सचिव प्राध्यापक ज्ञानेश्वर राऊत, संघटन मंत्री रामभाऊ शेरकर, कैलास चंद पालीवाल, भीमराव कुटे, तालुकाध्यक्ष अजम खान, तालुका उपाध्यक्ष माऊली शिंदे, संजय भागवत शाखा अध्यक्ष धानोरा रोड, डॉ. जितिन वंजारे समाजसेवक संजय, जवळ महाराष्ट्र रिक्षा युनियन सचिव संतोष गायकवाड शाखाध्यक्ष नाळवंडी नाका रिक्षा युनियन, महादेव प्रभाळे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा