Subscribe Us

header ads

आ.क्षीरसागरांनी घेतली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व बांधकाम विभागाची संयुक्त बैठक

बीड स्पीड न्यूज 


आ.क्षीरसागरांनी घेतली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व बांधकाम विभागाची संयुक्त बैठक

मतदारसंघातील रस्ताकामांबाबत निर्देश

बीड दि.19 (प्रतिनिधी):- बीड विधानसभा मतदारसंघातील शिरापूर धुमाळ ते छत्रपती शिवाजी महाराज चौक व बार्शी नाका ते जरूड रस्ता रहदारीयोग्य करणे, नवगण राजूरी ते खरवंडी कासार व नवगण राजुरी-रायमोह-शिरूर कासार  रस्त्याचा कामाला गती देणे तसेच बीड शहरातील राष्ट्रवादी भवन ते सोमेश्वर मंदीर रस्त्याचे उर्वरित काम पूर्ण करणेबाबत सोमवार (दि.१९) रोजी आ.संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेतली व याबाबत निर्देश दिले. बीड विधानसभा मतदारसं क्षेत्रातील  शिरापूर धुमाळ ते छत्रपती शिवाजी महाराज चौक (NH 561), बार्शी नाका ते जरुड (361F) ता.जि.बीड येथील रस्ता रहदारी योग्य करणे बाबत आ.संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे  अधीक्षक अभियंता श्री.थोरात, सार्वजनिक बांधकाम विभागचे कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा केली व या रस्त्या कामाच्या निविदा प्रक्रियेला उशीर होत असल्याने, सदरील रस्ता रहदारी योग्य करणे बाबत व नागरिकांना होतं असलेल्या अडचणी दुरु होण्यासाठी सविस्तर सुचना देऊन तात्काळ काम सुरु करणे बाबत निर्देश दिले. तसेच नवगण राजुरी ते खरवंडी कासार व नवगण राजुरी-रायमोह-शिरूर कासार (SH-59) या रस्त्यांचे काम संथगतीने सुरू असल्याने या कामांना गती देण्याचे निर्देश दिले. तसेच बीड शहरातील राष्ट्रवादी भवन ते सोमेश्वर मंदिर रस्त्याचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही आ.संदीप क्षीरसागर यांनी यावेळी दिले. या बैठकीदरम्यान आ.संदीप क्षीरसागर यांच्यासमवेत माजी आ.सय्यद सलीम, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 



पाच गावांना मावेजा मिळण्यासाठी उपजिल्हाधिकार्‍यांना सुचना

दरम्यान नवगण राजुर-रायमोह-शिरूर कासार या रस्ता कामात पाच गावांतील जमिनी संपादित करण्यात आल्या असून या बाबतचा मावेजा अद्यापपर्यंत संबंधितांना मिळाला नसल्याने संबंधितांना मावेजा अदा करण्यात यावा अशाप्रकारच्या सुचना देखील आ.संदीप क्षीरसागर यांनी बैठकीदरम्यान उपजिल्हाधिकारी यांना दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा