Subscribe Us

header ads

माजलगाव धरणात बुडून मृत्यू झालेल्या डॉ दत्तात्रय फपाळ यांचा मृतदेह सापडला

बीड स्पीड न्यूज 


माजलगाव धरणात बुडून मृत्यू झालेल्या डॉ  दत्तात्रय फपाळ यांचा मृतदेह सापडला


माजलगाव | प्रतिनिधी-: रविवारी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान डॉ दत्तात्रय फपाळ हे माजलगाव धरणात रोजच्या प्रमाणे पोहण्यासाठी गेले असता पोहताना दम लागल्याने त्यांचा मृत्यु झाला होता त्यांचा मृतदेह  कालपासून बीड आणि परळी येथील जवान धरणात शोधत होते. आज कोल्हापूर येथील एन डी आर एफ ची टीम देखील डॉ फपाळ यांचा मृतदेह शोधत असताना एन डी आर एफ चाजवान राजु मोरे याचा देखील आज पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. अखेर आज दिनांक १९ सप्टेंबर वार सोमवार  रोजी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या दरम्यान डॉ दत्तात्रय फपाळ यांचा मृतदेह मच्छीमारांच्या गळाला लागला डॉ दत्तात्रय यांचा मृतदेह पाण्यातुन बाहेर काढून माजलगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. जवळपास ३३ तासाच्या प्रयत्नानंतर डॉ दत्तात्रय फपाळ  यांचा मृतदेह शोधण्यास यश आलें. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक