Subscribe Us

header ads

दैनिक राज्य लोकतंत्र कार्यालयात एस.एम.युसूफ़ यांच्या पञकारितेचा सन्मान

बीड स्पीड न्यूज 


दैनिक राज्य लोकतंत्र कार्यालयात एस.एम.युसूफ़ यांच्या पञकारितेचा सन्मान



बीड (प्रतिनिधी) - शहरातील मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांचा दैनिक राज्य लोकतंत्र कार्यालयात संपादक इंजि. गणेश मोकाशे सरांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ लेखणी द्वारे समाजातील वेगवेगळ्या प्रश्नांवर वृत्तपत्रांच्या माध्यमातून वाचा फोडतात. ज्यामुळे अनेक कामांना शासकीय-प्रशासकीय स्तरावर गती मिळते, कामे होतात. लेखणीतून उचललेल्या मुद्द्यांवर कामे होत असल्याने सर्वसामान्य जनतेला याचा लाभ मिळतो. सामाजिक कार्य असो की पत्रकारिता आपल्याकडून समाजासाठी जे चांगले होईल ते करत राहावे. हा एस.एम.युसूफ़ यांचा मानस पाहून दैनिक राज्य लोकतंत्र चे संपादक इंजि. गणेश मोकाशे सरांनी कार्यालयात बोलावून पुष्पगुच्छ देत सन्मानित केले. या सन्मानाप्रती बोलताना युसूफ यांनी म्हटले की, पुणे येथे राहून ही एक संपादक म्हणून गणेश मोकाशे सरांनी माझ्या सामाजिक व लेखन कार्याची दखल घेत कार्यालयात बोलावून माझा जो सन्मान केला तो माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. शिवाय एका दैनिकाचे संपादक म्हणून एका मुक्तपत्रकाराच्या लिखाणाची नोंद घेत कार्यालयात बोलावून सन्मान केला. हा एक जागरूक संपादकाच्या मनाचा मोठेपणा आहे. यावेळी दैनिक राज्य लोकतंत्र चे कार्यकारी संपादक डॉ. बाळासाहेब पिंगळे, पत्रकार अनिल जाधव, अशोक सुखवसे, आबा मस्के यांची प्रमुख उपस्थिती होती.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा