Subscribe Us

header ads

साहित्य माणसाला विचार करायला लावते- प्रोफेसर डॉ.शिवाजी जवळगेकर

बीड स्पीड न्यूज 


साहित्य माणसाला विचार करायला लावते- प्रोफेसर डॉ.शिवाजी जवळगेकर

 
अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याने  परिवर्तनवादी भूमिका घेतली आहे-प्राचार्य डॉ.विवेक मिरगणे 


शिरूर का. (प्रतिनिधी) येथील कालिकादेवी कला वाणिज्य  व विज्ञान महाविद्यालयातील आय क्यू एस सी विभाग, कला व सामाजिक शास्त्रे यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन महाविद्यालयातील स्व. कै.  केशरबाई (काकू) क्षीरसागर सभागृहात दि- ६ ऑक्टोबर २०२२ रोजी करण्यात आले. या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटक म्हणून बंकट स्वामी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक मिरगणे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दयानंद महाविद्यालय लातूर येथील प्रोफेसर डॉ. शिवाजी जवळेकर हे उपस्थित होते. या राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विश्वास कंधारे हे होते. तर व्यासपीठावर दैनिक  लोकमतचे तालुका प्रतिनिधी विजयकुमार गाडेकर,आयक्यूएससी विभागाच्या चेअरमन डॉ. चेतना डोंगळीकर ,राष्ट्रीय परिषदेचे समन्वय डॉ. रमेश लांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.,परिषदेत  मार्गदर्शन करताना शिवाजी जवळगेकर म्हणाले की, साहित्य हे माणसाला विचार करायला लावते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी समाजातील वास्तव चित्रण आपल्या समग्र साहित्यातून मांडले आहे.शहरी जीवनामध्ये किंवा जीवन जगत असताना ज्या काही समस्या,अडचणी लोकांना जीवन जगताना आल्या त्या अडी-अडचणी व समस्या त्यांनी आपल्या समग्र साहित्यातून मांडल्या आहेत. तत्कालीन परिस्थितीवर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून प्रकर्षाने विरोध केला आहे. म्हणून त्यांचे विचार आज सुद्धा 2022 मध्ये उपयोगी पडतात. साहित्य आणि समाज यांचा अनन्य संबंध असल्याकारणाने समाजापासून साहित्य आणि साहित्य पासून समाज हा वेगळा केला जात नाही म्हणून साहित्याने विचार मांडले आहेत आणि विचाराने त्या त्या काळामध्ये क्रांती घडवलेली आहे. त्यामुळे माणसांना विचार करायला लावणारे हे साहित्यच असते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या समग्र कादंबरीतून साहित्यातून परिवर्तनवादी नायक, नायिका त्यांनी चित्रित केल्या आहेत. आणि त्या नायिका आणि नायक तत्कालीन परिस्थितीमध्ये रुढी,परंपरा, अंधश्रद्धा यांच्याविरुद्ध बंडखोरपणे विरोध करताना आपणास दिसतात. असेही ते राष्ट्रीय परिषदेतील सहभागी संशोधकांना मार्गदर्शन  करताना म्हणाले उद्घाटन प्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ.विवेक मिरगणे म्हणाले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या समग्र साहित्यातून परिवर्तनवादी  विचार मांडले आहेत.समाजाला दिशा देण्याचे काम व समाजाला स्वाभिमानाने जगण्याचे भान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या समग्र साहित्याने दिले आहे. समाजात जगत असताना स्वाभिमानाने जगावे रूढी, परंपरा अंधश्रद्धेला विरोध करून ताठ मानेने जीवन जगावे  असा संदेशही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या समग्र साहित्यातून मिळाला आहे.माणसाला माणसाप्रमाणे वागवावे माणूस म्हणून त्याला जगू द्यावे हीच भूमिका समग्र साहित्यातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मांडली आहे. पृथ्वीही शेषाच्या मस्तकावर तरली नसून श्रमिकाच्या तळहातावर तळली आहे ही भूमिका लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी मांडली आहे. या एक दिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेत  राष्ट्रीय बेस्ट टीचर पुरस्कार 2022 साठी देहरादून येथील डॉ.प्रगती बर्नवाॕल ,गेवराई येथील डॉ.तबसून  इनामदार आणि उस्मानाबाद येथील डॉ. सहदेव रसाळ तर बेस्ट संशोधक पुरस्कार 2022 साठी ऐश्वर्या वसंत सानप  यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. तसेच बेस्ट रिसर्च पेपर पुरस्कारही यावेळेस देण्यात आले.यासाठी प्रा. डॉ. शैला गुप्ता , प्रा. डॉ. बी.व्ही राख (पाटोदा )प्रा. डॉ.अहिल्या बरुरे(आंबेजोगाई) प्रा.डॉ. शिवाजी गायकवाड ( उस्मानाबाद ) प्रा. डॉ. उषा खंडागळे (चंद्रपूर) यांनाही याप्रसंगी पुरस्कार देण्यात आले. समारोप सत्रामध्ये प्रमुख व्याख्याते  म्हणून विद्यार्थी कल्याण मंडळ संचालक तथा अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्र संचालक डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील डॉ.संजय सांभाळकर यांनी राष्ट्रीय परिषदेतील सहभागी प्राध्यापकांना व संशोधकांशी संवाद साधला. या राष्ट्रीय परिषदेचे सूत्रसंचालन प्रा. सय्यद अफरोज व प्रोफेसर डॉ. अशोक घोळवे यांनी केले. या राष्ट्रीय परिषदेचे प्रास्ताविक राष्ट्रीय परिषदेचे समन्वयक प्रा. डॉ. रमेश लांडगे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार डॉ.विठ्ठल जाधव यांनी मानले.या राष्ट्रीय परिषदेमध्ये विविध महाविद्यालयातून प्राध्यापक ,संशोधक विद्यार्थी यांनी हजेरी लावली तसेचमहाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा