Subscribe Us

header ads

मिल्लिया महाविद्यालयाचे स्वच्छता अभियान संपन्न

बीड स्पीड न्यूज 


मिल्लिया महाविद्यालयाचे  स्वच्छता अभियान संपन्न

बीड: येथील मिल्लीया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे स्वच्छ भारत अभियान (Clean India Campaign- 2022) अंतर्गत मंगळवार दिनांक ११-१०-२०२२ रोजी  कॅनल रोड, सिंहगड लॉन्स  शेजारील पाणी टाकी (जलकुंभ) परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले.  राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थी- विद्यार्थ्यांनी यांनी परिसर स्वच्छ केला तसेच प्लास्टिक बॅग, रिकाम्या पाणी बाटल्या जमा केल्या. तसेच महाविद्यालय परिसर स्वच्छ करण्यात आला. या स्वच्छता अभियानामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रोफेसर डॉ. मिर्झा असद बेग,  डॉ. शेख रफीक, प्राध्यापिका डॉ. शेख एजाज परवीन, डॉ. रमेश वारे, डॉ. सौदागर यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील  यांचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक