Subscribe Us

header ads

जन्मदात्या पित्याने केली मुलाची आणि पत्नीची हत्या; स्वतः फोन करुन घटनेची माहिती दिली पोलिसांना

बीड स्पीड न्यूज 


जन्मदात्या पित्याने केली मुलाची आणि पत्नीची हत्या; स्वतः फोन करुन घटनेची माहिती दिली पोलिसांना 


माजलगाव -: माजलगाव तालुक्यात खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे तालुक्यांतील मंजरथ येथे काळे वस्ती म्हणून एक वस्ती आहे या वस्तीवर पांडूरंग दोडतले हे कुटुंब राहत होते. आज सकाळी पहटेच्या दरम्यान पांडूरंग याने साखर झोपेत असलेली पत्नी लक्ष्मी आणि मुळगा पील्या यांना तीक्षहत्याराने वार करून हत्या केली. हत्या केल्यानंतर पांडूरंग दोडतले याने स्वतः फोन करुन घटनेची माहिती ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली. महिती मिळताच घटनास्थळी पोलीसांनी धाव घेतली आणि आरोपी पांडूरंग याला अटक करण्यात आली असुन पांडूरंग याने मुलाची आणि पत्नीची हत्या का केली हे अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेनंतर मंजरथ परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा