Subscribe Us

header ads

मराठी पत्रकार परिषदेच्या बुलडाणा जिल्हा उपाध्यक्षपदी अनिल उंबरकर यांची निवड सर्वस्तरातून अभिनंदन व शुभेच्छा

बीड स्पीड न्यूज 

(वृत्तसंकलनः-आत्माराम ढेकळे)

मराठी पत्रकार परिषदेच्या बुलडाणा जिल्हा उपाध्यक्षपदी अनिल उंबरकर यांची निवड सर्वस्तरातून अभिनंदन व शुभेच्छा



पुणेः---मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्नित  बुलडाणा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी शेगावचे  लोकमत चे पत्रकार अनिल उंबरकर यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातुन अभिनंदन व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. मराठी पत्रकार परिषद ,मुंबई सोबत संलग्नित असलेल्या बुलडाणा जिल्हा मराठी पत्रकार  संघाची उर्वरीत कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बर्दे यांच्या नेतृत्वात बुलडाणा जिल्हा पत्रकार भवन येथे मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख ,किरण नाईक, राजेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली  नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष शरद पाबळे,व अमरावती विभागीय सचिव अमर राऊत यांच्या सहीनिशी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.त्यामध्ये प्रामुख्याने शेगाव येथील  लोकमत चे पत्रकार  अनिल उंबरकर यांची बुलडाणा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
बुलडाणा जिल्हा मराठी  पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी अनिल उंबरकर यांची निवड झाल्याबद्दल  त्यांचे स्नेही ज्येष्ठ पत्रकार आत्माराम ढेकळे, सुवर्णकार पत्रकार समुहाचे संस्थापक संयोजक उमेश बीडकर,स्त्री शक्ती फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ.अर्चनाताई सोनार,एबीएसएसव्हीएसएस चे प्रदेशाध्यक्ष रामचंद्र कपिले,दैवज्ञ सोनार एकता संघाचे अध्यक्ष मधुकर टोंपे,सचिव नामदेव सुवर्णकार  ,वधु-वर सुचक चे संयोजक प्रसाद पोतदार  आदी संस्था ,संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असुन त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत. सुवर्णकार समाजातील एका अभ्यासू मनमिळावु पत्रकाराला जिल्हास्तराववर कार्य करण्याची संधी दिल्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेच्या सर्व विश्वस्त  व पदाधिकाऱ्यांचे सर्व शाखीय सुवर्णकार समाजाचे मार्गदर्शक व पत्रकार आत्माराम ढेकळे यांनी  आभार  मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा