Subscribe Us

header ads

भरधाव टेम्पोने दुचाकीला चिरडले मजुर महिलेसह मिस्त्री ठार

बीड स्पीड न्यूज 

भरधाव टेम्पोने दुचाकीला चिरडले मजुर महिलेसह मिस्त्री ठार 

बीड | प्रतिनिधी -: बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ मिस्त्री आणि मजुर महीला बांधकामावरून दुसरीकडे मोटारसायकलवरुन जात असताना छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ आले असता एका भरधाव येणाऱ्या टेम्पोने मोटार सायकलला जोराचीधडक देऊन चिरडले या मध्ये मजुर महीला (अनिता भारत सरपते वय ४० वर्ष राहणार गोविंदनगर  धानोर रोड बीड) आणि मिस्त्री (कालिदास विठ्ठल जाधव वय ३८ वर्ष राहणार शेलगाव गांजी ता. केज) असे मयतांचे नावे आहेत. मजूर महिला आणि मिस्त्री हे एका बांधकाम करण्यासाठी मोटरसायकल वरून मांजरसुंबा येथे जात होते. तर टेम्पो क्रमांक एम एच १५ ए व्ही १८४७ हा भरधाव वेगाने गेवराईकडे जात होता. हा टेम्पो धुळे सोलापूर महामार्गावर छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ आला असता मोटरसायकलला सामोरा समोर जोराची धडक दिली हा अपघात इतका भयानक होता की मजूर महिलेचा मृतदेह टेम्पो खाली अडकल्याने अखेर क्रेन च्या साह्याने महिलेचा मृतदेह काढण्यात आला. मोटरसाकलवरील दोघे जागीच ठार झाले घटनेचे महिती मिळताच बीड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष साबळे उपनिरीक्षक देविदास आवरे, हवालदार चव्हाण, आनंद मस्के यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्हीं मृतदेह बीड येथील जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आणि दोन्हीं वाहणे बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा