Subscribe Us

header ads

संभाजी ब्रिगेड महिला आघाडीची घोडदौड.अंबाजोगाई तालुका उपाध्यक्षपदी जमुनाताई सुरवसे यांची निवड

बीड स्पीड न्यूज 

संभाजी ब्रिगेड महिला आघाडीची घोडदौड.अंबाजोगाई तालुका उपाध्यक्षपदी जमुनाताई सुरवसे यांची निवड

अंबाजोगाई (प्रतिनिधी) संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोजदादा आखरे, महासचिव सौरभदादा खेडेकर, बीड जिल्हा संपर्क प्रमुख डॉ.सुदर्शन तारख, विभागीय अध्यक्ष राहूल वायकर यांच्या आदेशानुसार बीड जिल्हाअध्यक्ष प्रविण ठोंबरे व जिल्हा कार्याध्यक्ष सेवकराम जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संभाजी ब्रिगेड महिला आघाडी अंबाजोगाई तालुका उपाध्यक्षपदी जमुनाताई सुरवसे यांची निवड करण्यात आली. या प्रसंगी महिला आघाडी बीड जिल्हा उपाध्यक्ष अश्विनीताई यादव, महिला आघाडी अंबाजोगाई तालुका अध्यक्ष  सुनंदाताई लोखंडे,संभाजी ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय गंगने, पोपटराव लोंढे यांची उपस्थिती होती. बीड जिल्ह्यासह अंबाजोगाई तालुक्यातील लोकाभिमुख कामासाठी संभाजी ब्रिगेड महिला आघाडी दक्ष असेल असे मत महीला आघाडी कडून व्यक्त करण्यात आले. सामाजिक व राजकीय क्षेत्रात पूर्ण ताकदीने महिला आघाडीच्या माध्यमातून काम करू अशी भावना नवनियुक्त तालुका उपाध्यक्ष जमुणाताई सुरवसे यांनी व्यक्त केली.अंबाजोगाई सोबतच केज व परळी तालुका महिला आघाडीच्या निवडीची बैठक लवकरच घेण्यात येईल. अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे  यांनी बैठकी दरम्यान दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा