दुचाकी चोरांची मोठी टोळी दिंद्रुड पोलीसांच्या हाती; १० दुचाकीसह दोन जण पकडले सपोनि प्रभा पुंडगे यांची धडाकेबाज कारवाई
तेलगाव, दि.(प्रतिनिधी):
गेल्या कांही दिवसांपासुन दिंद्रुड पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या घटना वाढत असल्याने हा प्रकार दिंद्रुड पोलीसांसाठी आवाहन होता. त्यातच शुक्रवारी रात्री दिंद्रुड पोलीसांनी दुचाकी चोरी करणारी टोळी पकडली असुन,दहा दुचाकीसह जप्त करून दोन आरोपींना अटक करण्यात यश मिळवले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रभा पुंडगे यांनी ही धडाकेबाज कारवाई केली असुन, या टोळीकडुन दिंद्रुड हद्दीसह जिल्ह्यातील अनेक चोरीच्या दुचाकींचा तपास लागण्याची शक्यता असल्याचे सपोनि पुंडगे यांनी सांगितले. दरम्यान ही धडाकेबाज कारवाई केल्या बद्दल दिंद्रुड पोलीसांचे सर्वञ अभिनंदन होत आहे.
यासंदर्भात पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी सायंकाळच्या वेळी तेलगाव येथील एक दुचाकी चोरीस गेल्याची घटना घडली होती. याघटनेची दिंद्रुड पोलीसांनी गंभीरतेने दखल घेऊन, कांही तासात दुचाकी चोरास दुचाकी सह अटक केली. सदर दुचाकी चोरास अटक करून, दिंद्रुड पोलीस ठाण्यात आणुन,त्याला विश्वासात घेऊन, त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने या दुचाकी चोरीत आणखी कांही साथीदार असल्याचे सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक राजा रामस्वामी, डीवायएसपी जायभाय यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रभा पुंडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपीने दिलेल्या माहितीनुसार व सांगितलेल्या ठिकाणी जाऊन एक दोन नव्हे तर तब्बल दहा दुचाकी जप्त करून आणुन त्या दिंद्रुड पोलीस ठाण्यात लावल्या आहेत. यासोबतच वडवणी येथुन अन्य एका आरोपीला ही अटक करण्यात पोलीसांना यश मिळाले.शुक्रवारी रात्री आरोपीस अटक केली होती. त्यानंतर पोलीसांनी लगेच त्याच्याकडे चौकशी करून, त्याने दिलेल्या माहितीनुसार विशेष पथकाची नियुक्तती करून राञीतुनच वडवणी येथुन १,पिंपळनेर पोलीस स्टेशन हद्दीतुन ३,सोनीमोहा येथुन २ ,अंबाजोगाई पो.स्टे. हद्दीतुन १,रायमोहा येथुन २व अन्य एक अशा तब्बल दहा दुचाकी जप्त केल्या. दिंद्रुडच्या सपोनि प्रभा पुंडगे यांच्यासह त्यांचे सहकारी पीएसआय विठ्ठल शिंदे व अनिल भालेराव, बालाजी सुरेवाड, सरवदे,संजय मुंडे आदि पोलीसांनी राञभर जागरण करून दहा दुचाकींसह आरोपी नितीन वसंत मुंडे रा.पहाडी दहिफळ ता.धारूर व गणेश काशिनाथ गायकवाड रा.पार्थी जि.परभणी या दोन आरोपींना अटक केली. दिंद्रुड पोलीसांनी राञभर तपास एवढी मोठी धडाकेबाज कारवाई केल्या बद्दल त्यांचे सर्वञ अभिनंदन होत आहे. दोन आरोपींना अटक केली असुन ही मोठी टोळी असण्याची शक्यता असुन, अन्य आरोपींचा शोध घेतला जात असल्याचे पोलीसांनी सांगुन या टोळीकडुन जिल्ह्यातील इतरही ठिकाणच्या दुचाकी चोरीचा तपास लागण्याची शक्यता वर्तवली.
दुचाकी चोरीचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असुन, आम्ही कसुन तपास करून या रॅकेटचा पर्दापाश करू: सपोनि प्रभा पुंडगे
शुक्रवारी रात्री तेलगाव येथे पकडलेल्या दुचाकी चोराकडुन दुचाकी चोरीचे मोठे रॅकेट उघडकीस येत असुन, त्याच्याकडून काढलेल्या माहिती नुसार आता पर्यंत दहा दुचाकी जप्त केल्या असुन, दोन आरोपींना अटक केली. तर त्याने सांगितलेल्या आरोपीपैकी दोन आरोपींचा तपास चालु असुन, लवकरच तेही गजाआड होतील. अशी प्रतिक्रिया दिंद्रुडच्यासपोनि प्रभा पुंडगे यांनी व्यक्त करून, ही गेल्या कांही दिवसांपासुन सर्वञच दुचाकी चोरीच्या घटना वाढत असुन, दिंद्रुड पोलीसांच्या हाती लागलेल्या या दुचाकी चोरीच्या टोळीकडुन जिल्ह्यातील इतरही ठिकाणच्या दुचाकी चोरीचा तपास लागण्याची शक्यता पुंडगे यांनी व्यक्त करून, एस.पी.राजा रामस्वामी व डीवायएसपी जायभाय साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लवकरच या टोळीतील सर्व आरोपींना अटक करून, दुचाकी चोरीच्या टोळीचा पर्दापाश करू. असा विश्वास ही प्रभा पुंडगे यांनी व्यक्त केला.
0 टिप्पण्या