Subscribe Us

header ads

शिवसंग्रामच्या आंदोलनाला यश बीड शहरातील पथदिवे होणार सुरू

शिवसंग्रामच्या आंदोलनाला यश बीड शहरातील पथदिवे होणार सुरू



 बीड (प्रतिनिधी) :- शहरातील पथदिवे गेल्या अनेक दिवसापासून बंद असून, या विरोधामध्ये नगरपरिषदेकडे वेळोवेळी निवेदन देऊन देखील नगरपालिका प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्यामुळे शिवसंग्रामच्या वतीने शिवसंग्रामचे युवा नेते दत्ताजी गायकवाड हे गेल्या तीन दिवसापासून धरणे आंदोलन करत होते. या धरणे आंदोलनाला यश आले असून, नगरपालिकेच्या वतीने येत्या दोन-तीन दिवसांमध्ये संपूर्ण शहरातील पथदिवे चालू करू, असे लिखित आश्वासन नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी दिली आहे.

आ.विनायकरावजी मेटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसंग्राम बीड शहरातील नागरिकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर येवून सातत्याने आंदोलन करत आहे. तसेच सर्व सामान्य् जनतेच्या न्यायहक्क प्रश्नांवर शिवसंग्राम एकाकी लढा देत आलेला आहे.  या अगोदरही दत्ताजी गायकवाड यांनी रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी पेठबीड भागामध्ये आंदोलन केले होते. शहरातील अनियमित पाणीपुरवठा संदर्भात शिवसंग्रामच्या वतीने महिलांचा प्रचंड मोर्चा नगरपालिकेवर धडकला होता. शहरांमधील राहणाऱ्या जनतेला ज्या हक्काच्या सुविधा आहेत त्या मिळाव्यात म्हणून शिवसंग्रामच्या वतीने वेळोवेळी आंदोलन उपोषण करण्यात येत आहे. तरी देखील निगरगट्ट प्रशासन व नगराध्यक्ष जनतेच्या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत. येणाऱ्या काळामध्ये जर या प्रश्नांची सोडवणूक झाली नाही, तर नगरपालिकेच्या विरोधामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवसंग्रामच्या वतीने देण्यात येत आहे.


शहरातील पथदिव्या च्या संदर्भात धरणे आंदोलनामध्ये शाहूनगर तसेच बीड शहरातील सुजान नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांचेही शिवसंग्रामच्या वतीने आभार मानण्यात येत आहेत. आंदोलन यशस्वी करण्यासाठी शिवसंग्रामचे रामहरी भैय्या मेटे, अनिल घुमरे, सुहास पाटील, शेषराव तांबे, सुनील शिंदे, राहुल गायकवाड, यांनी मार्गदर्शन केले. आंदोलन यशस्वी करण्यासाठी शिवसंग्रामचे नेते, मच्छिंद्र कुटे, मनोज जधव, प्रशांत डोरले, प्रकाश जाधव, अनिकेत देशपांडे, अझजर भाई, सुरेश बावळे, शेख लालाभाई, शैलेश सुरवसे, सुनिल धायजे, हरिश्चंद्र ठोसर, सुरज बहिर, राजु पठाण, आदी उपस्थित होते. तसेच शाहूनगर मधील सुजान नागरिकांनी देखील दत्ता गायकवाड यांनी उभारलेल्या या आंदोलनाला सक्रीय पाठिंबा दर्शवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा