Subscribe Us

header ads

नगरपरिषदेच्या बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांची चौकशी करा, बांधकाम सभापती आसेफोद्दीन खतीब आणि पत्रकार ताहेर चाऊस यांच्या आमरण उपोषणाला अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचा जाहीर पाठिंबा उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन


अंबाजोगाई प्रतिनिधी-: नगरपरिषदेच्या लेखा परिक्षण अहवालाप्रमाणे 1999 ते 2020 पर्यंत 48,95,99,193.00 चे भ्रष्ट व नियमबाह्य बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांची चौकशी करुन दोषी पदाधिकाऱ्याला पदच्युत करून दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी, या मागणीसाठी येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर नगर परिषदेचे बांधकाम सभापती असिफोद्दीन खतीब, ताहेर सय्यद यांनी आमरण उपोषण आज दिनांक 28 जुलै बुधवारपासून सुरू केले आहे. दरम्यान या उपोषणाला  अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीतीच्या मराठवाडा संपर्क प्रमुख मोहंमद ताहेर, अंबाजोगाई तालुका अध्यक्ष शेख फेरोज, अंबाजोगाई शहर अध्यक्ष रहेमत पठाण, सामाजिक कार्यकर्ते समिउल्ला पठाण, अंबाजोगाई तालुका अध्यक्ष आरोग्य सेल शेख रशीद यांनी पाठिंबा दिला आहे.

या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगरपरिषद, अंबाजोगाईची गेल्या 25 वर्षांपासून सतत एकहाती सत्ता असल्यामुळे पदाधिकारी कायदा, नियम, शासनाचे आदेश धाब्यावर बसवून काम करित आहेत. लेखा परिक्षकाने दरवर्षी नगरपरिषदेच्या कामकाज व आर्थिक व्यवहारांवर गंभीर स्वरूपाचे आरोप व ताषेरे मारले आहे. परंतु, नगर परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी ह्या गंभीर बाबीकडे आपल्या स्वार्थापोटी दुर्लक्ष करित आहेत. यामुळे नगरपरिषदेची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस हलाखीची व‌ बिकट होत आहे. नगरपरिषदेला शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा निधी येतो. परंतु, नगरपरिषदेचे पदाधिकारी आपल्या जवळच्या कंत्राटदारांच्या नावावर कामे घेऊन नियमबाह्य निविदा काढून आणि निकृष्ट दर्जाचे काम करुन बीलं उचलित आहेत.

नगर परिषद संचालनालय, मुंबई यांचे स्थायी निर्देश क्रमांक 36 दि. 29/12/05 मधील सूचना क्रमांक 33 नुसार अंदाजपत्रकीय रक्कम 50000 पेक्षा जास्त असेल तर 'ई टेंडर' करणे बंधनकारक आहे किंवा राज्यस्तरीय वर्तमानपत्रात प्रसिद्धी देणे बंधनकारक आहे. परंतु, नगरपरिषदेने शासनाच्या या निर्देशाला धाब्यावर बसवून अंबाजोगाईच्या स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्धी देऊन केवळ कायद्याची पुर्तता करण्याचा हेतू साध्य केला आहे. विस्तृत प्रसिद्धी न झाल्याने निविदेची प्रसिद्धी झाली नाही व स्पर्धा न झाल्यामुळे नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान झाले आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 

या निवेदनात नगरपरिषदेच्या बेकायदेशीर कामाबाबत आदी मागण्या करण्यात आल्या असून निवेदनावर  बांधकाम सभापती असिफोद्दीन खतीब, ताहेर सय्यद यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रती संबंधित अधिकारी, संबंधित खात्याचे मंत्री यांच्यासह मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा