Subscribe Us

header ads

पवनदीप राजन ‘इंडियन आयडॉल विजेता.

मुंबई : गेल्या वर्षी सुरू झालेला ‘इंडियन आयडॉल १२’ या देशातील सर्वात लोकप्रिय शोचा विजेता कोण होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असतानाच रात्री १२ च्या ठोक्याला विजेत्याच्या नावाची घोषणा झाली. पवनदीप राजन हा ‘इंडियन आयडॉल १२’ चा विजेता ठरला, तर अरूणिता कांजीलाल ही उपविजेती ठरली. पवनदीप राजन व अरूणिता हे दोघेही शोच्या विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. अखेर चाहत्यांच्या मतांच्या आधारावर पवनदीपने बाजी मारली. ‘इंडियन आयडॉल’ची चकाकती ट्राफी आणि २५ लाखांचा धनादेश देऊन पवनदीपला गौरविण्यात आले.परीक्षक सोनू कक्कर, अनु मलिक आणि हिमेश रेशमिया यांच्यासह इंडियन आयडॉल १२ चा १२ तासांचा ग्रेट ग्रँड फिनाले रंगला. चित्रपट जगतातील अनेक सेलिब्रिटींनी यावेळी हजेरी लावली.जावेद अली, मनोज मुंतशीर, उदित नारायण, कुमार सानू, मिका सिंग, अल्का याग्निक, साधना सरगम अशा अनेक दिग्गजांनी ग्रेट ग्रँड फिनालेमध्ये धमाकेदार परफॉर्मन्सही दिलेत. या शोच्या माजी स्पर्धकांनीही एकापाठोपाठ एक दमदार परफॉर्मन्स दिले. प्रत्येकाने अनु मलिकसोबतही परफॉर्मन्स दिले. प्रत्येकजण गात असताना, अनु मलिक पियानो वाजवत होते. सगळेच कलाकार धमाल करताना दिसले़ सुखविंदर सिंह यांना मोहम्मद दानिशसोबत ‘लगन लागी’ हे गाणे सादर केले़ हिमेश रेशमियाने निहालसोबत परफॉर्म दिला. हिमेशने २ सर्वप्रथम ‘चलाओं ना नैनो से बाण रें’ हे गाणं गायले, तर निहालने ‘तेरा चेहरा’ हे गाणं गायले.अल्का याग्निक आणि पवनदीप राजन यांची जुगलबंदीही यावेळी पाहायला मिळाली. ‘राहों में उनसे मुलाकात हो गई’ हे गाणं सादर करत त्यांनी सर्वांची मने जिंकली. मिका सिंगने प्रथम सर्व महिला स्पर्धकांसोबत, नंतर पुरुष स्पर्धकांसोबत परफॉर्मन्स दिले आणि शेवटी त्याने सर्वांसोबत रॉकिंग परफॉर्मन्स दिला.

महाराष्ट्राची सायली कांबळे तिसऱ्या क्रमांकावर

मागील वर्षभरापासून गायन क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी अनेकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. त्यानंतर शेवटच्या सहा स्पर्धकांमध्ये आज चुरस रंगली. यामध्ये पवनदीपने बाजी मारली, तर दुसऱ्या स्थानी अरुणिताने बाजी मारली. महाराष्ट्रच्या सायली कांबळेला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. चौथा क्रमांक मोहम्मद दानिश, पाचवा क्रमांक निहाल तोरोने मिळविला, तर षण्मुखा प्रिया सहाव्या स्थानावर राहिली.

कोण आहे पवनदीप राजन?

‘इंडियन आयडॉल १२’च्या एका भागात बप्पी लहरी यांनी पवनदीपला सोन्याची साखळी भेट दिली होती. हिमेश रेशमियाने त्याला एक नाही तर १० गाण्यांची ऑफर दिली आहे. पवनदीप राजन मूळचा उत्तराखंडमधील कुमाऊंचा राहणारा आहे. संगीताचा वारसा त्याला घरातच मिळाला. पवनदीपचे वडील आणि काका यांनी त्याला बालपणापासून संगीताची शिक्षा दिली. त्याचे आजोबा त्या काळातील प्रसिद्ध लोककलावंत होते. पवनदीपने याआधीही एक सिंगींग रिअ‍ॅलिटी शो जिंकला आहे. २०१५ साली ‘व्हॉईस इंडिया’च्या पहिल्या सीझनचा तो विजेता होता. केवळ दोन वर्षाचा असताना पवनदीपने एक विक्रम रचला होता. लहानपणापासून पवनदीप तबला वाजवतो. दोन-अडीच वर्षाचा असताना त्याला सर्वाधिक कमी वयाचा तबलावादक म्हणून गौरविण्यात आले होते, तबल्याशिवाय पियानो, ढोलकी, की-बोर्ड, गिटार इत्यादी वाद्य तो वाजवतो. पवनदीप म्युझिक डायरेक्टरही आहे.देशविदेशात त्याने अनेक लाईव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्म केला आहे. पवनदीपने आत्तापर्यंत १३ देशांत आणि भारताच्या १४ राज्यांत सुमारे १२०० शो केले आहेत. इतक्या कमी वयात इतकी मोठी कामगिरी केल्याने उत्तराखंड सरकारने पवनदीपला ‘युथ अ‍ॅम्बॅसिडर ऑफ उत्तराखंड’ या किताबाने गौरविले होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा