Subscribe Us

header ads

गरीब वस्त्यांमध्ये अल्पदरात अहोरात्र सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान अल् हिंद सौतुल इस्लाम फाउंडेशन कडून डॉ. इलियास खान यांच्या हस्ते कोविड योद्धा पुरस्कार प्रदान

बीड (प्रतिनिधी) - शहरातील गांधीनगर भागात असलेल्या अल् हिंद सौतुल इस्लाम फाउंडेशन कडून कोरोना काळात गोरगरीब वस्त्यांमध्ये अत्यंत अल्पदरात अहोरात्र सेवा देणाऱ्या कर्तबगार  डॉक्टरांना बालरोगतज्ज्ञ डॉ. इलियास खान यांच्या हस्ते कोविड योद्धा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
पुरस्कार समारंभामध्ये डॉ. जिया उर रहेमान, डॉ. सय्यद जफर अली, डॉ. परवेज निसार अहेमद, डॉ. मन्सूर शेख, डॉ. इस्माईल सय्यद, डॉ. फैजान जैद, डॉ. अब्दुल अजीज, डॉ. रेहान जैद शेख या डॉक्टरांना कोविड योध्दा पुरस्कार  देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा गांधीनगर भागात असलेल्या अल् कबीर फंक्शन हॉल मध्ये रविवार दिनांक 15 ऑगस्ट 2021 रोजी पार पडला.
यावेळी बोलताना डॉक्टर इलियास खान यांनी आरोग्याविषयी उपस्थितांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. यामध्ये मुख्यतः कोरोना बाबत अनेक समज-गैरसमज अधोरेखीत केले. तसेच कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता लोकांनी कोरोना व्हॅक्सिन घ्यावी. तसेच अनुमानित तिसऱ्या लाटे पासून वाचण्यासाठी दक्ष रहावे असेही म्हटले. याशिवाय अल् हिंद सौतुल इस्लाम फाउंडेशन स्थापनेपासून आतापर्यंत करत असलेल्या सामाजिक कार्याविषयी फाउंडेशन च्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना म्हटले की, कोरोना काळात या फाउंडेशनने अनेक गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप केले तर अडल्यानडलेल्यांना गरजेवेळी आर्थिक मदतही केली आणि डॉक्टरांच्या सेवेची नोंद घेत आज डॉक्टरांनाही सन्मानित केले. याबद्दल फाऊंडेशनचे आभार व्यक्त केले. तसेच यापुढेही फाउंडेशन कडून अशाच प्रकारे सातत्याने समाजासाठी चांगले कार्य होत राहावे अशा सदिच्छा ही व्यक्त केल्या. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष मुफ़्ती मुहम्मद अन्वर नोमानी, जमियत उलमा ए हिंद चे शहराध्यक्ष मौलाना वसीम खान कासमी, संगणकतज्ञ शेख रेहान आणि मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांची प्रमुख उपस्थिती होती.
हा पुरस्कार कार्यक्रम वितरण सोहळा यशस्वी करण्यासाठी मौलाना शफीक, मौलाना नाजिम, मौलाना अन्सार, शेख शाहनवाज़, शेख सोहेल, इरफान शाह, आरिफ बेग, सुफियान बागवान, इमरान शाह, बब्बू बागवान, सोहेल शेख़, आरिफ आत्तार, अब्दुल माजिद, शेख आसिफ, तौफ़िक, सोनू इनामदार, अतीक उर रहेमान, फरहान, जावेद गुत्तेदार, उबेद भाई, असलम, शेख जुनैद, अमीर साहब, बबलू, आफताब, ज़ाकिर, अय्यूब इनामदार, उमेर अरबाज पटेल, अल्ताफ, मुन्नाभाई, अबुजर, सय्यद ख़ालेद आदींनी परिश्रम घेतले.

*तरुणांमध्ये डॉ. इलियास खान यांची मोठी क्रेझ!*

डॉ. इलियास खान हे पेशाने जरी डॉक्टर असले तरी आरोग्य क्षेत्रासह ते मोटर बाईक रायडिंग, बॉडी बिल्डिंग आणि हॉर्स रायडिंग सारख्या क्षेत्रांमध्ये मध्ये करत असलेल्या कार्याबद्दल तरुणांमध्ये विशेष असे आकर्षण आहे. याची प्रचिती कार्यक्रम संपल्यानंतर कार्यक्रमात उपस्थित तरुणांमध्ये त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी स्पर्धा लागल्याने दिसून आले. आपल्या व्यस्ततेतून वेळ काढून कार्यक्रमात आलेले डॉक्टर इलियास खान यांनीही तरुणांना निराश न करता सर्वांना आपल्या सोबत फोटो काढू दिले. यामुळे तरुणांमध्ये त्यांची किती क्रेझ आहे हे दिसून आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा