Subscribe Us

header ads

सासू-सासऱ्याने सुनेला भावाच्या मुलासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले.

बीड-: बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात घराण्याचा वंश फक्त मुलगाचं चालवू शकतो. यासाठी चक्क आपल्या सुनेला दुसऱ्या एका पुरुषा सोबत अनैतिक संबंध ठेवायला भाग पाडल्याची संतापजनक घटनेने बीड जिल्हा हादरला आहे. पोटच्या मुलाला मूल होणार नाही हे माहिती झाल्यानंतर, वंशाला दिवा पाहिजे ही मागणी करत, चक्क सासू-सासऱ्याने सुनेला मारहाण करून, चक्क भावाच्या मुलासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले .मला न सांगता अहमदनगर येथील देशपांडे हॉस्पिटल मध्ये टेस्ट ट्यूब बेबी करून घेतली.माझं विवाह गेल्या १५ वर्षांपूर्वी, आष्टी तालुक्यातील कडा परिसरात राहणाऱ्या मोठोबा भिसे यांच्याशी झाला आहे. आम्ही नंदीबैलाच्या माध्यमातून भीक्षा मागून कुटुंबाची उपजीविका भागवतो. २०२० मध्ये माझ्या सासूने मला सांगितले, की ‘तुझा नवरा बाप होऊ शकत नाही. सासूने सांगितलेल्या गोष्टीवर मला विश्वास बसला नाही. त्यामुळं मी माझ्या पतीला विचारून याची शहानिशा केली आणि पतीने  देखील हेच उत्तर मला दिले . आणि माझ्या पायाखालची वाळू सरकली. मात्र, त्यापूर्वी २०१६ मध्ये माझ्या पतीसह सासू-सासर्‍यांनी, मला न सांगता अहमदनगर येथील एका हॉस्पिटल मध्ये टेस्ट ट्यूब बेबी करून घेतली आणि मला मुलगी झाली. अशी माहिती पीडितेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले  आहे. माझ्या सासूने माझे माझे पती एका महिन्यासाठी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. याचाच फायदा घेऊन सासू म्हणाली, की तुझा नवरा कधीच बाप बनू शकत नाही, त्यामुळे आपला वंश चालविण्यासाठी तुला एक मुलगा होणे गरजेचे आहे.त्यासाठी माझ्या भावाच्या मुला सोबत, तू शारीरिक संबंध ठेवून आम्हाला एक मुलगा दे. त्या गोष्टीला मी नकार दिला असता माझ्या सासू-सासर्‍यांनी मला खूप मारहाण केली. असे देखील पिडीतेने म्हटलं आहे. दरम्यान, नंतर सततच्या मारहाणीला आणि त्रासाला कंटाळून, नाईलात्सव मला होकार द्यावा लागला.

*पोटात असणाऱ्या बाळाला, बापाचं नाव काय द्यावे*

वंशाला दिवा पाहिजे म्हणून सासू – सासऱ्यांनी हे कृत्य करण्यास भाग पाडले . ती गरोदर राहिल्यावर पेढे वाटले, अनेकांना दारू पाजली. मात्र आज पोटात असणाऱ्या बाळाला, बापाचं नाव काय द्यावे . असा प्रश्न तिच्यासमोर निर्माण झाला आहे. पीडिता ही पाच महिन्यांची गरोदर आहे. त्यामुळे तिझ्यासमोर जगावे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे.माझ्या नवऱ्याला हे सर्व कळले आणि त्यांनी माझ्या भावाला बोलवून मला माहेरी पाठवले . काही दिवसांनी मी गरोदर राहिल्याची गोष्ट मी माझ्या सासू सासर्‍यांसह नवर्‍याला सांगितली. हे ऐकून त्यानंतर सासू-सासर्‍यांनी मला हॉस्पिटलमध्ये देखील घेऊन गेले आणि त्यांनी पेढे देखील वाटप केले.मात्र यादरम्यान माझ्या नवऱ्याला हे सर्व कळले  आणि त्यांनी माझ्या भावाला बोलवून मला माहेरी पाठवले. असे पीडितेने फिर्यादीत म्हटले दरम्यान, अनेक वेळा माझी इच्छा नसताना, माझ्या सासू-सासऱ्यांचा दबावाखाली त्याने अनेक वेळा घरी येऊन माझ्यासोबत जबरदस्ती केली. सासू घराबाहेर थांबत असे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा