Subscribe Us

header ads

पाठीवर कौतुकाची थाप आणि मदतीचा एक हात परळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रं.२ चा उपक्रम

परळी/ प्रतिनिधी-: जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नंबर 2 जगतकर गल्ली भिमनगर, परळी‌ वै. याठिकाणी आज "पाठीवर कौतुकाची" थाप आणि मदतीचा एक हात या उपक्रमा अंतर्गत या भिमनगर जगतकर गल्ली,परळी.  भागातील प्रतिष्ठित नागरिक व पालकाची बेठक बोलून त्यांचा स्वागत सत्कार करून  कार्यक्रमाची सुरूवात केली. प्रस्ताविका मध्ये मुख्याध्यापक  हणमंत भद्रे  यांनी शाळेच्या संदर्भामध्ये असलेल्या अडीअडचणी सांगितल्या त्यामध्ये शाळेची संरक्षण भिंत, शाळेची रंगरंगोटी, शालेय साहित्य,  इमारतीची डागडुजी,पाण्याची टाकी, संगणक संच, बोलक्या भिंती व इतर महत्त्वाच्या साहित्य संदर्भात त्यांनी माहिती सांगितली, कोरना च्या लॉकडाउनच्या दोन वर्षाच्या कार्यकाळात त्यांचं शालेय नुकसान झाला आहे ते भरून काढण्यासाठी आम्ही सर्व शिक्षक वृंद मेहनत करून हा बंद असलेला कालखंड शैक्षणीक झिज भरून काढण्यासाठी प्रयत्नशील आहोत आम्हाला आपल्या परिसरातील प्रतिष्ठित नागरीक व सक्षम पालक  यांच्या  मदतीची आवश्यकता आहे. म्हणून हा उपक्रम जिल्हा परिषद शाळेत राबविण्यात आला, त्याला प्रतिसाद देत या भागाचे नगरसेवक बाजीराव धर्माधिकारी यांनी त्यांच्या स्व. माणिक बाजीराव धर्माधिकारी  ट्रस्टच्यावतीने दहा हजार रुपये रोख मदत जाहीर केली व लागणारे इतर मदतही जिल्हा परिषद शासन मार्फत सर्व मिळवून देण्याचे शब्द दिले, या भागाचे माजी नगराध्यक्ष वैजनाथ तात्या जगतकर यांनी पाच हजार रुपये, प्रा. विनोद जगतकर यांनी यांच्या  कालकथित बंधू प्रमोद जगतकर यांच्या  स्मरणार्थ तीन हजार रुपये,बीड अक्षरधामचे संपादक बालाजी जगतकर यांनी रोख दोन हजार रुपये तर युवा उद्योजक राहुल जगतकर यांनी एक हजार रुपये, प्रताप समिंदरसावळे यांनी दोन हजार रुपये प्रा. शिरीष जगतकर यांनी रोख एक हजार रुपये अशा स्वरूपात आर्थिक मदत शाळेला प्राप्त झाली आहे, अनेक प्रतिष्ठित नागरिक व पालक  पुढे येऊन या आपल्या भागातील शाळेला मदत करतील अशी अपेक्षा व्यक्त केली  प्रमुख पाहुणेबाजीराव (भैया)धर्माधिकारी वैजनाथ (तात्या) जगतकर, सिताराम जगतकर,प्रा.विनोद जगतकर,प्रताप जगतकर(शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष) संपादक बालाजी जगतकर,प्रा.शिरीष जगतकर ,राहुल जगतकर, प्रताप समिनदरसवळे, संजय जगतकर,रमेश जगतकर,अशोक जगतकर, रावसाहेब जगतकर सुयोग आवचारे, प्रेम जगतकर, चंद्रकला आवचारे,आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  भद्रे हणमंत (मुख्याध्यापक) चिद्ररवार अश्विनी, सावरगावकर प्रणिता, कविता कस्बे, आदीने कार्यक्रम यशस्वी केला.कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन  सावरगावकर  मॅडम तर अभार चिद्रवार मॅडम यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा