पीडित मुलीच्या वडिलांवर
अंत्यसंस्कारासाठी आणला दबाव
पीडितेच्या वडिलांनी पुढे सांगितले की, २३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ च्या सुमारास मला घरमालकाचा फोन आला. ते म्हणाले माझी मुलगी अन्न विषबाधेमुळे मरण पावली आहे. चार तासांनंतर घरमालकाची पत्नी, प्रवीण आणि इतर दोघांनी माझ्या मुलीचा मृतदेह एका खासगी रुग्णवाहिकेतून दिल्लीत आणला. एफआयआरमध्ये म्हटले आहे की, मुलीच्या वडिलांवर यावेळी अंत्यसंस्कारासाठी दबाव आणला गेला.पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितले कि, त्यांच्याकडे लाकूड आणि पूजेच्या वस्तू होत्या. ते माझ्या मुलीचे अंत्यसंस्कार करण्यास तयार होते. आम्हाला काहीच कल्पना नव्हती. मात्र, आमच्या शेजाऱ्यांनी हे अंत्यसंस्कार थांबवले. त्यांनी आम्हाला माझ्या मुलीच्या शरीराची तपासणी करण्यास सांगितले. जेव्हा आम्ही मृतदेह पाहिला तेव्हा आम्हाला धक्काच बसला. तिच्या चेहऱ्यावर आणि पाठीवर जखमा होत्या. आम्ही कल्पनाही केली नव्हती की ते माझ्या मुलीचा जीव घेतील. आम्ही घाबरलो आणि पोलिसांना बोलवले.पुढे बाबू जगजीवन राम रुग्णालयात करण्यात आलेल्या पीडित मुलीच्या पोस्टमार्टमच्या अहवालात असे म्हटले आहे की, योनी आणि गुदद्वारासंबंधी लैंगिक अत्याचाराचे पुरावे आहेत आणि सर्व जखमा मृत्यू पूर्वीच्या अगदी जवळच्या कालावधीतील आहेत.
पीडित मुलीच्या आईने सांगितलं कि, घरमालक आणि त्याची पत्नी आमच्याशी खोटे बोलले. आम्ही त्यांचा आदर केला आणि त्यांनी माझ्या मुलीची हत्या केली. त्यांना अटक व्हावी अशी माझी इच्छा आहे. रक्षाबंधनाला मी त्यांना फोन केला आणि विनंती केली की आम्हाला पत्ता द्या जेणेकरून आम्ही आमच्या मुलीला पाहू शकू. पण त्यांनी नकार दिला. ते माझ्या मुलीचं काय करत आहेत हे मला माहीत असतं तर हा दिवस पाहावा लागला नसता.
पीडित मुलीचे वडील म्हणाले, मी माझ्या मुलीशी १०-१५ दिवसांपूर्वी शेवटचे फोनवर बोललो होतो. ती जास्त काही बोलली नाही. मी तेव्हा काहीतरी करू शकलो असतो तर खूप बरा झाला असता
POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
पीडित मुलगी ही तिच्या तीन लहान भावंड आणि आई वडिलांसोबत राहत होती. मूळचे बिहारचे रहिवासी असलेले ते भाड्याच्या घरात राहतात. दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले कि, आम्ही कुटुंबाने केलेल्या पीसीआर कॉलचे सर्व तपशील आणि पोस्टमार्टम अहवाल गुडगाव पोलिसांना पाठवला आहे. ह्यात असे आढळून आले आहे की, या मुलीवर गुडगावमध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आले आणि तिचा मृतदेह दिल्लीला आणण्यात आला.एसीपी पश्चिम, गुडगाव, राजिंदर म्हणाले, पालकांच्या तक्रारीवरून आम्ही प्रवीण आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. मुलीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी दिल्लीच्या रुग्णालयात पाठवण्यात आला. आम्हाला त्यांच्याकडून एक अहवाल मिळाला की, मुलीवर लैंगिक अत्याचार झाले. आम्ही आता बलात्काराच्या कलमांखाली पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रवीणला अटक करण्यात आली आहे. तर सुरुवातीला गुडगावमध्ये २५ ऑगस्ट रोजी या प्रकरणी खून आणि गुन्हेगारी कट रचणे आणि एससी/एसटी कायद्याखाली एफआयआर नोंदवण्यात आला होता.
0 टिप्पण्या