Subscribe Us

header ads

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे यावर सर्वांचेच एकमत· प्राप्त सूचना, उपलब्ध पर्यायांचा अभ्यास करून शुक्रवारी पुन्हा बैठक

मुंबई दि.27 : ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे या विषयावर सगळ्याच पक्षांचे एकमत आहे. यासंदर्भात सर्वपक्षीय बैठकीत प्राप्त झालेल्या सूचना, विविध पर्यांयाचा अभ्यास करून येत्या शुक्रवारी यावर सर्वानुमते निर्णयाप्रत येण्यासाठी बैठक घेऊ असे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.

            ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवारमहसूल मंत्री बाळासाहेब थोरातसार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणउद्योग मंत्री सुभाष देसाईनगर विकास मंत्री एकनाथ शिंदेअन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळइतर मागास वर्ग व बहूजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवारपरिवहन मंत्री अॅड.अनिल परबविधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरविधान सभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसआमदार कपिल पाटीलआमदार देवेंद्र भुयार यांच्यासह सर्वपक्षीय नेते सर्वश्री विनायक मेटेजोगेंद्र कवाडेराजेंद्र गवईशैलेंद्र कांबळेबाळासाहेब दोडतुलेमिलिंद रानडेडॉ. अरुण सावंत आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

            स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे यावर सर्वपक्षांचे एकमत आहे. राजकीय आरक्षणामध्ये येणा-या अडचणी दूर करण्याबाबत सर्वांनी केलेल्या सूचनांचे स्वागत आहेअसे सांगून मुख्यमंत्र्यांनी यासंबंधी विविध राजकीय पक्षांची मते समजून घेतली. ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होऊ नयेत ही सर्वांचीच भावना असल्याचे ते म्हणाले. दरम्यान बैठकीत प्राप्त झालेल्या सूचना आणि पर्यायांचा येत्या काही दिवसात अभ्यास करून येत्या शुक्रवारी यासंबंधाने सर्व सहमतीने निर्णय घेऊ असे ते म्हणाले.

            या महत्वाच्या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी सर्वपक्षीय नेते उपस्थित राहिल्याची बाब स्वागतार्ह असल्याचे सांगून ओबीसी आरक्षणासाठीची सर्वपक्षीय एकजूट आणि एकमत असेच टिकवून ठेऊया असेही श्री.ठाकरे यांनी म्हटले.

            बैठकीत प्रास्ताविक करताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री. भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणासंबंधात शासकीय पातळीवर करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व पक्षीय नेत्यांनी आरक्षण टिकवून ठेवण्यासाठीचे विविध पर्यायसूचना यासंबंधातील आपली मते मांडली.  निमंत्रित सर्वपक्षीय मान्यवरांनी या महत्वाच्या विषयावर सर्वपक्षीय बैठक आयोजित केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

            बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटेग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमारमुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंहमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगेइतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्तानगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. महेश पाठकविधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव नीरज धोटे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा