Subscribe Us

header ads

पतीच्या जाचाला कंटाळून गर्भवती महिलेची आत्महत्या

 


केज : रविवारी दुपारच्या दरम्यान ज्योती गोविंद जाधवर (रा.उकडगाव, ता. बार्शी) या विवाहित महिलेने माहेर असलेल्या दरडवाडी ता.केज येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी रात्री तीनच्या सुमारास ज्योती जाधवर हिला गोविंद जाधवरने मारहाण करून दरडवाडी येथे माहेरी सोडून गावी परत गेला होता. यावेळी मुलीच्या सांगण्याप्रमाणे लग्न झाल्यापासून पती, सासू, सासरा व दीराचा सतत जाच सुरू असल्याचे सांगितले. मुलीने वडील, भाऊ, आई व इतर सदस्य शेतात गेल्याचे औचित्य साधून रविवारी घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, ज्योती ही सात महिन्यांची गर्भवती होती. ज्योतीचा पती हा उस्मानाबाद पोलीस दलामध्ये कार्यरत असून सासरच्या त्रासाला कंटाळून ज्योतीने आत्महत्या केल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केला आहे. घटनास्थळी पोउपनि शंकर वाघमोडे, जमादार जसंवत शेप, पोना रशीद शेख यांनी पंचनामा केला. सोमवारी सकाळी ग्रामीण रुग्णालय नांदुरघाट येथे ज्योतीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेमुळे गावात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा