Subscribe Us

header ads

बीड नगरपालिकेने स्वच्छता करण्यासाठी दिलेल्या कंपनीला काळया यादीत टाका. दोषी अधिकारी, कर्मचारी चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करा -- माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी बीड

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे
🔶🔶🔷🔷🔶🔶🔷🔷

बीड प्रतिनिधी_ बीड आम आदमि पार्टी आठवडी स्वच्छता मोहिमेत निदर्शनात आले. शहरामध्ये नगरपालिकेने ज्या कंपनीला बीड शहराचे स्वच्छतेचे टेंडर दिले आहे ती कंपनी चांगल्या प्रकारे काम करत नसून शहरातील कचऱ्याचे ढिगारे वेळेवर उचलत नाही आणि जे कचऱ्याचे ढिगारे उचलले जातात तो कचरा निश्चित केलेल्या जागेवर न टाकता शहरांमध्ये वाहत असलेल्या बिंदुसरा नदी पात्रात  जिथे दिसेल मोकळी जागा तेथे कचरा टाकण्याचे काम या कचरा गाड्या करत आहेत याच प्रमाणे खंडेश्वरी चा डोंगर खंडोबाचा डोंगर आणि एमआयडीसी मधून जाणारा रस्ता या रस्त्याच्या दोन्ही बाजूने कचऱ्याचे ढिगारे टाकण्याचं काम ही कंपनी करत आहे जिथे ओपन स्पेस दिसू लागेल जिथे मोकळी जागा दिसेल तिथे कचऱ्याचे ढीग लावण्याचं काम ही कंपनी करत आहे आणि या सर्व कामाकडे नगरपालिका प्रशासन डोळे व कान बंद करून बघ्याची भूमिका घेत आहे यावरून शंका होते की भूमाफिया आणि नगरपालिका प्रशासन व कचरा उचलणारी कंपनी या सगळ्यांची साठ गाठ असून जिथे ओपन स्पेस भेटेल तेथे कचरा टाकला जातो व त्याला लेव्हल करून भूमाफिया च्या घशात घालून सामान्य जनतेचे जीव धोक्यात घालण्याचं काम केलं जातं या मध्ये नगर प्रशासन कचरा कंपनी व भू माफिया यांची  साठ गाठ होत आहे म्हणून आम आदमी पार्टी अशी मागणी करत आहे की एक चौकशी कमिटी स्थापन करण्यात यावी जो यामध्ये दोषी असेल त्यांच्यावर ती कठोर कारवाई करण्यात यावी यामध्ये होत असलेला मोठा घोटाळा दिसत आहे याची चौकशी करून संबंधित कंपनी वरती व संबंधित अधिकाऱ्यांवर ती कर्मचाऱ्यांवर  योग्य ती कारवाई झाली पाहिजे ही मागणी आम आदमी पार्टी करत आहे आठवड्याच्या स्वच्छता मोहिमेमध्ये खंडेश्वरी या भागांमध्ये गेले असता हे सर्व उघडकीस आले या मोहिमेमध्ये आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे शहर प्रमुख सय्यद सादेक कैलाश चंद पालीवाल खजिनदार इत्यादी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा