Subscribe Us

header ads

नरेगाच्या कामात १७ लाखांचा अपहार; अभियंता, शिक्षकासह पोस्टमनवर फसवणुकीचा गुन्हा

अंबाजोगाई_सहा वर्षापूर्वी अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव ते फावडेवाडी दरम्यानच्या रस्ते कामाचे चुकीचे अंदाजपत्रक तयार केले. तसेच, एका शिक्षकाला ठेकेदार दर्शविले. विशेष म्हणजे चक्क मयत व्यक्तींच्या नावे बोगस खाते काढून रक्कम उचलण्यात आली. या रस्त्याचे कोणतेही काम न करता १७ लाख ८ हजार ४६८ रुपये उचलून शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपावरून जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचा शाखा अभियंता, माध्यमिक शाळेतील शिक्षक आणि पोस्टमनवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बर्दापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. अंबाजोगाई तहसीलचे नायब तहसीलदार गणेश सरोदे यांनी याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिली होती.त्यांच्या फिर्यादीनुसार, मौजे पत्तीवडगाव ते फावडेवाडी रस्ता काम भाग ०२ हा १७०० ते ३४०० एम या रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरण काम महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत सन २०१४ ते १५ मध्ये करण्याबाबत अंबाजोगाई तहसीलदारांनी १२ जानेवारी २०१५ रोजी कार्यारंभ आदेश दिला होता. सदर कामाची यंत्रणा जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग अंबाजोगाई ही होती. मात्र, येथील तत्कालीन शाखा अभियंता एम.एस. चव्हाण याने सदर रस्त्याच्या कामाचे चुकीचे अंदाजपत्रक तयार केले. तसेच, रस्त्याचे कोणतेही काम न करता त्याबाबत मोजमाप पुस्तिकेत नोंदी घेतल्या व त्याबाबतचे बोगस देयके तयार करून शासनाची फसवणूक केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा