Subscribe Us

header ads

राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या केज तालुकाध्यक्ष पदी अजय भांगे यांची निवड


 केज प्रतिनिधी/ दि.पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवत देशपातळीवर कार्यरत असलेला बलाढ्य संघ म्हणजे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतात काम करत आहे.शुक्रवार दि. ९ रोजी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री संतोष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री वैभव पाटील,मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुंढे यांच्या शिफारशीनुसार  केज तालुकाध्यक्ष पदी अजय भांगे यांची निवड करण्यात आली आहे. अजय भांगे यांच्या निर्भिड व निःपक्ष पत्रकारितेची दखल घेऊन राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री संतोष निकम यांनी अजय भांगे यांच्यावर केज तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे.
   राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री संतोष निकम, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री वैभव पाटील, महाराष्ट्र प्रदेश महासचिव रमेश देसाई व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र सोळुंके मराठवाड प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुंढे यांनी अजय भांगे यांच्या कामाचा आढावा घेऊन केज तालुक्याची जबाबदारी देऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अजय भांगे यांच्या निवडीमुळे सर्व स्तरातुन त्यांचे अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा