Subscribe Us

header ads

लक्ष्मणराव (दादा) रोडे गुरुजींचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने संपन्न

बीड (प्रतिनिधी)  तथागत भगवान गौतम बुद्धांच्या संम्यक विचाराने प्रेरित होऊन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन, ज्ञानार्जनाचे कार्य करताना विविध समाजकार्यात अग्रेसर असणारे आयु. लक्ष्मणराव (दादा) रोडे गुरुजी यांचा 84 वा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून सम्राट अशोक बुद्ध विहार, बलभीम नगर, पेठ बीड. याठिकाणी दि. O9/09/ 2021 रोजी सायंकाळी 08 वाजता  साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु.संदीप उपरे (अध्यक्ष,सत्यशोधक ओबीसी परिषद म.रा.) तर प्रमुख अतिथी आयु. राजू जोगदंड ( रिपाई जिल्हा सरचिटणीस बीड), आयु. अमरसिंह ढाका (राज्य संघटक,सत्यशोधक ओबीसी परिषद म.रा.),प्रा. डॉ. अनिता शिंदे, इंजि. वचिष्ठ तावरे,मा. बनसोडे साहेब (निवृत्त सीईओ)आदी. उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत रोडे परिवाराच्या वतीने, तुलशी शैक्षणिक समूहाचे संचालक प्रा. प्रदीप रोडे यांच्या हस्ते भीमदूत व्हि.जे. आरक हे पुस्तक व गुलाब पुष्प देऊन करण्यात आले तर बलभीम नगर परिसरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन केल्याने शिक्षक अजितकुमार जाधव व प्रा. बाळासाहेब शिंदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.सम्राट अशोक बुद्ध विहार येथे पु.भिखु धम्मशील यांचा वर्षावास सुरू  आहे. या पवित्र काळात याच विहारात वाढदिवस साजरा होत असल्याने पु.भंतेजी करीता चीवरदान, बुद्ध विहारा करिता महापुरूषांच्या विचारधारेचे 100 ग्रंथ, पुस्तकांचे कपाट, परिसरातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप तर उपस्थित सर्वांना खीरदान करण्यात आले.या वेळी पु.भिखु धम्मशील यांनी मंगल कामना व्यक्त केल्या तर सर्व प्रमुख अतिथी यांनी लक्ष्मणराव (दादा)रोडे यांच्या कार्यावर प्रकाश टाकून त्यांना पुढील निरोगी आयुष्य लाभो अशा मंगलमय शुभेच्छा व्यक्त केल्या.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रदीप रोडे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन प्रा. अंकुश कोरडे यांनी केले.  कार्यक्रमास धम्म उपासक-उपासिका पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येने उपस्थित होते तर रोडे परिवाराशी आपले नाते सांभाळणारे सर्व स्तरातील नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा