Subscribe Us

header ads

धनुभाऊंच्या मुजोर ठेकेदाराने पैठण-पंढरपुर राष्ट्रीय महामार्गाची वाट लावली, लोकप्रतिनिधींकडून मौन, नितिनजी गडकरी, प्रकल्प संचालकांना तक्रार--- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर


पाटोदा_पाटोदा तालुक्यातील पैठण ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 चे रस्ताकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून  घुमरा पारगाव ते अनपटवाडी दरम्यान रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या असून  तिरूपती कन्स्ट्रक्शन परळीचे ठेकेदार धनंजय मुंढे यांचे कार्यकर्ते असून दैनिकात बातम्या प्रसिद्ध झाल्या अथवा कितीही तक्रारी, आंदोलन केले तरी माझे काहीही बिघडत नाही अशा प्रकारची मुजोर भाषा वापरली जात असून  आ.बाळासाहेब आजबे व आ.सुरेश आण्णा धस या लोकप्रतिनिधींकडून तसंबधित प्रकरणात गुणनियंत्रक विभागामार्फत चौकशी करून संबंधित ठेकेदार, शासकीय अभियंता यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येऊन कन्स्ट्रक्शन कंपनीचे नाव काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी व प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण योजना कार्यान्वन भारत सरकार औरंगाबाद विभाग,अरविंद काळे यांना ईमेल द्वारे केली आहे 

सविस्तर माहीतीस्तव:-
__
पैठण ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 या रस्त्याचे काम 2017 पासुन सुरू असून ठेकेदार अर्धवट काम केले असून पाटोदा व शिरूर तालुक्यातुन जाणारा 67 किलोमीटर लांबीचा रस्त्याचे बायपासचे काम अर्धवट राहीले असून वारंवार निवेदन, आंदोलनानंतर सुद्धा कोणतीही सुधारणा करण्यात आली नाही. पाटोदा तालुक्यातील मौजे घुमरा पारगाव ते अनपटवाडी दरम्यान रस्त्याच्या मध्यभागी मोठ्याप्रमाणात भेगा पडल्या असून त्याठीकाणी रात्री-अपरात्री वाहनाची चाके भेगामध्ये फसुन अपघात होऊन जिवितहानी होण्याची शक्यता आहे त्यामुळेच या निकृष्ट रस्त्याप्रकरणात गुणनियंत्रक विभागामार्फत चौकशी करण्यात येऊन संबधित ठेकेदार व अभियंत्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येऊन निकृष्ट दर्जाचे काम करणा-या तिरूपती कन्स्ट्रक्शन परळी कंपनीचे नाव काळ्या यादीत टाकण्यात यावे. व देयके देण्यात येऊ नयेत अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे यांनी केली आहे. 
   

धनंजय मुंढेचा वरदहस्त व आ. आजबे, सुरेश धस यांचे मौन यामुळे ठेकेदाराचा मुजोरपणा वाढला:-डॉ. गणेश ढवळे 
___
वरील निकृष्ट रस्त्याप्रकरणात तिरूपती कन्स्ट्रक्शन परळीचे मालक ठेकेदार हे धनंजय मुंढे यांचे जवळचे कार्यकर्ते असल्याने व स्थानिक आ.  बाळासाहेब आजबे व आ. सुरेश आण्णा धस लोकप्रतिनिधींकडून राजकीय लाभापोटी मौन साधले जात असल्याने ठेकेदाराचा मुजोरपणा वाढला असून पत्रकार  यांच्या प्रसिद्ध बातम्या अथवा सामाजिक कार्यकर्ते यांचे निवेदने, आंदोलने याचा फरक पडत नसल्याचे उघड उघड बोलवुन दाखवत 
आहे. 

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर 
मो. नं.8180927572

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा