Subscribe Us

header ads

माजलगाव धरणाला मा.वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावे, राज्यातील बंजारा समाजाची मागणी

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे
🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷

बीड प्रतिनिधी/ हरित क्रांतीचे जनक, आंतरराष्ट्रीय किर्तीचे कृषीतज्ञ, महाराष्ट्र राज्याचे १२ वर्ष म्हणजे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद यशस्वीरित्या सांभाळणारे माजी मुख्यमंत्री माहानायक वसंतरावजी नाईक यांचे नाव बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणाला विनाविरोध देण्यात यावे व नाईक साहेबांच्या कार्याचा गौरव करावा,अशी मागणी राज्यातील शेतकरी शेतमजूर बहुजन बंजारा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे..२० सप्टेंबर २०१९ रोजी माजलगाव शहरात भव्य बंजारा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
मेळाव्याचे उद्घाटन तत्कालीन विरोधीपक्षनेते तथा विद्यमान सामाजिक न्याय मंत्री आदरनिय धनंजयजी मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री तथा माजलगाव आमदार आदरनिय प्रकाशदादा सोळंके,किनवटचे माजी आमदार तथा बंजारा समाजाचे जेष्ठ नेते प्रदिप नाईक हे उपस्थित होते.या मेळाव्यात बंजारा समाजाच्या हिताचे अनेक ठराव घेण्यात आले होते, त्या पैकी माजलगाव धरणाला माजी मुख्यमंत्री वंदनीय वसंतरावजी नाईक साहेब यांचे नाव देण्यात यावे हा पहिला ठराव आ प्रकाशदादा सोळंके, मंत्री ना.धनंजयजी मुंडे यांच्या उपस्थितीत एकमताने मंजूर करण्यात आला आहे .विरोधासाठी व्यक्ती विरोध म्हणून नाईक साहेबांचे नावाला कोणी जाणुनबुजून विरोध करणार असेल तर राज्यातील बंजारा बहुजन भटके विमुक्त समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल,असा इशारा बीड जिल्हा गोर बंजारा संघर्ष समितीच्या वतीने राष्ट्रीय बंजारा परिषदचे राष्ट्रीय महासचिव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा.पी.टी.चव्हाण यांनी एका पत्रकाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे,जलसंधारण मंत्री, पाटबंधारे विभागाचे मंत्री यांना दिला आहे.मा.वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्री पदाची तीन वेळा शपथ घेऊन राज्यात रेकॉर्ड करून दाखवले आहे.
त्यांच्या काळात रोजगार हमी योजना,चार कृषी विद्यापीठाची निर्मिती, बॅंक व सहकारी साखर कारखाने राज्यात सुरु झाले, स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण केल्या.परळी, चंद्रपुर,कोराडी नागपूर इत्यादी शहरात औष्णिक विज निर्मिती केंद्र उभारुन महाराष्ट्राला विजेची कमतरता भासू दिली नाही. महाराष्ट्रात उद्योग निर्माण करण्यासाठी एमआयडिसी, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ सुरू केले.जमीन सुधारणा कायदा सुरू करुन शेतीला उद्योगाचा दर्जा दिला.   अरूणावती यवतमाळ,उजनी महाकाय प्रकल्प सोलापूर, जायकवाडी महा प्रकल्प पैठण, अप्पर वर्धा धरण, माजलगाव धरण बीड अनेक मोठी धरणे बांधण्यात आली आहेत. त्यामुळे करोडो एकर जमीन ओलिताखाली आली, शेतकरी सुखी संपन्न झाला याचे श्रेय मा.वसतरावजी यांना जाते.त्याच बरोबर नाईक साहेबांनी नवी मुंबईची निर्मीती केली आहे, पांढ-या सोन्याचे (कापूस) राखणदार म्हणून नाईक साहेबांना म्हटले जाते.१९६६ साली वसंतराव नाईक यांनी मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा दिल्याची घोषणा केली. मुंबई गिरणगावातील कामगारांच्या चाळी वाचविण्यासाठी नाईक साहेबांनी शर्थीचे प्रयत्न केले. महाराष्ट्र राज्य लाटरी नाईक साहेबांनी सुरू केली आहे. त्या काळात उसळलेली भिवंडीची दंगल नाईक साहेबांच्या यशस्वी मध्यस्थी मुळे शांत झाली.शेतकऱ्यांना दलालांच्या तावडीतून सोडवून घेण्यासाठी कापूस व ज्वारी एकाधिकार योजना सुरू केली,माझा शेतकरी कारखानदार झाला पाहिजे अशी भूमिका नाईक साहेबांनी घेतली, १९७२ च्या वेळी जनता अन्नधान्य न मिळाल्याने बेजार झालीं होती. दोन वर्षांत जर मी महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करू शकलो नाही तर, शनिवार वाड्यासमोर मी फाशी घेईन,अशी भीष्म प्रतिज्ञा करणारे नाईक साहेब जागतिक पातळीवरील एकमेव विशाल मणाचे आणि प्रचंड इच्छाशक्ती असलेले नेते होते. विदेशातून हायब्रीड बियाणे आणून राज्यात यशस्वी प्रयोग केला. शेतीचे उत्पादन अनेक पटींनी अधिक वाढले.त्यामुळे शेतकरी शेतमजूर स्वावलंबी झाले.नाईक साहेबांनी सुरू केलेली *रोहयो* हि योजना केंद्रसरकारने *नरेगा* जशीच्या तशी सुरू केली. राज्यातील भटके विमुक्त यांच्या साठी व्हिजेएनटी प्रवर्ग निर्माण करुन त्यांना शिक्षण व नौकरीत आरक्षण दिले,१९९० नंतर माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या प्रयत्नातून ओबीसींचे राजकीय आरक्षण बहाल झाले.असे एक नाही तर शेकडो निर्णय शेतकरी शेतमजूर, उद्योजक, शिक्षण सम्राट,खाखर सम्राट, गोरगरीब शोषित वंचित निराधार, पाल वाडी वस्ती तांड्यावरील लोकांच्या जीवनात अमुलाग्र बदल व्हावा,ते घटक विकासाच्या प्रवाहात यावेत म्हणून नाईक साहेब रात्रंदिवस मेहनत घेतली. राज्याचा चेहरा मोहरा बदलून टाकला..महाराष्ट्र राज्याला प्रगती व विकासाच्या बाबतीत क्रमांक एकचे राज्य बनवले.वसंतराव नाईक साहेब सारख्या धुरंधर नेत्यांची महाराष्ट्र राज्य वारंवार उपेक्षा करीत आहे,हि चिड आणणारी गोष्ट आहे.ज्या नेत्यांनी शेतकरी शेतमजूर स्वावलंबी बनविलेले, राज्यात चार पेक्षा जास्त महाकाय प्रकल्प बांधून करोडो एकर जमीन ओलिताखाली आणली, त्या वसंतराव नाईक यांचे नाव महाराष्ट्र सरकारने एखाद्या प्रकल्पाला देऊन त्यांचा गौरव सन्मान का करू नये,?म्हनून बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणाला पाणी आडवा पाणी जिरवा या करावी मोहिमेचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वंदनीय वसंतरावजी नाईक साहेब यांचे नाव विनाविरोध देण्याचा निर्णय (घोषणा) महाराष्ट्र सरकारने त्वरित करावी,अशी मागणी राज्यातील बंजारा समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.नाईक साहेबां सारख्या पुरोगामी विचारसरणीच्या नेत्याला विशिष्ट जातीचे होते म्हणून जातीपातीच्या भिंतीत कैद करण्याचा एखाद्या पक्षाने किंवा नेत्याने अथवा कोणी प्रयत्न केला,तर महाराष्ट्रातील बंजारा भटके विमुक्त,बहुजन समाज हे कदापिही सहन करणार नाही,याचे परिणाम या मंडळींना येणाऱ्या काळात भोगावेच लागेल,राज्यातील बंजारा समाज रस्त्यावर उतरून जेलभरो आंदोलन करेल असा इशारा पत्रकान्वये राज्य सरकारला देण्यात आला आहे.पत्रकावर प्रा.पी.टी.चव्हाण,जायकोबा राठोड,शरद पवार,सुरेश पवार, संजय चव्हाण, रमेश पवार, सचिन राठोड,गोरख पवार, बाजीराव राठोड,अमर राठोड, रमेश जाधव, सतिश पवार, अंकुश राठोड यांच्या स्वाक्षरी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा