Subscribe Us

header ads

देशातील प्रत्येक बालकांला शिक्षण घेण्याचा, आरोग्याचा व व्यक्त होण्याचा अधिकार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे--- बाजीराव ढाकणे


जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या वतीने कायदेविषयक जनजागरण शिबिर मौजे नाळवंडी येथे संपन्न

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे
🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷
बीड प्रतिनिधी :- मौजे नाळवंडी ता जि बीड येथे कार्यक्रम संपन्न मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार व माननीय श्री हेमंत महाजन साहेब प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दिनांक 17 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता नाळवंडी ता. जि. बीड येथे कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या निमित्ताने या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री सिद्धार्थ गोडबोले साहेब सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर बीड , प्रमुख पाहुणे श्री बाजीराव ढाकणे , बीड जिल्हा समन्वयक, कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती, महाराष्ट्र राज्य तथा जिल्हा समन्वयक ,लेक लाडकी अभियान, तसेच प्रमुख वक्ते अँड रामप्रसाद गायकवाड ,कायदेशीर सल्लागार विधीज्ञ, श्रीमती विद्याताई तंबरे सरपंच , श्री शिवाजीराव पंडित ग्रामविकास अधिकारी, श्री ज्ञानेश्वर राऊत, सामाजिक कार्यकर्ते व नाळवंडी गावातील ग्रामस्थ गावकरी यांची प्रमुख उपस्थिती होती , सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. अँड. रामप्रसाद गायकवाड  यांनी सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक करून कायदे विषयक जनजागरण अभियानचा मुख्य  उद्देश न्याय सब के लिये Access to Justic for all . सदर योजना मध्ये वेगवेगळ्या कायद्यांची माहिती तसेच संविधानाचे प्रस्तवणा मधील सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य यामध्ये बदल करता येत नाही , त्यानुसार सर्वांना न्याय मिळतो तसेच मूलभूत अधिकार आणि कर्तव्य त्याबद्दल कायदेविषयक माहिती दिली तसेच वेगवेगळ्या शासकीय  योजनांची माहिती संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ राष्ट्रीय आर्थिक लाभ योजना तसेच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड असून ज्यांचे लोकांचे उत्पन्न सत्तर हजारा पर्यंत असते अशा लोकांना या ठिकाणी न्यायालयीन कामकाजासाठी मोफत वकील उपलब्ध करून दिले जातात व त्यामुळे गोरगरीब जनतेला न्यायालयातून मोफत न्याय मिळतो अशी माहिती दिली.श्री बाजीराव ढाकणे सामाजिक कार्यकर्ते यांनी ग्राम बाल संरक्षण समितीची रचना ,कार्ये व कर्तव्य याविषयी सखोल माहिती दिली तसेच बालविवाह कायदा व महिलांचे आणि बालकांचे अधिकार तसेच बाल विवाह प्रतिबंधक कायदा बद्दल सविस्तर माहिती देऊन लग्नासाठी मुलाचे वय 21 वर्षे आणि मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाले असले पाहिजे अशी माहिती दिली.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना माननीय श्री सिद्धार्थ गोडबोले साहेब सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर बीड यांनी पालक आणि ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण अधिनियम , मनोधैर्य योजना गुन्ह्यात बळी पडलेल्या महिला व मुलींसाठी शासनामार्फत आर्थिक सहाय्य दिले जाते तसेच मोटार वाहन कायदा बद्दल कायदेविषयक माहिती दिली व महिलांविषयक कायदे या  विषयावर सविस्तर असे मार्गदर्शन केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण च्या सर्व योजना सांगितल्या. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कल्याण तंबरे यांनी केले व आभार प्रदर्शन श्री ज्ञानेश्वर राऊत सामाजिक कार्यकर्ते यांनी केले सदर कार्यक्रमास नाळवंडी ग्रामपंचायत सदस्य , कर्मचारी व ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा