Subscribe Us

header ads

भोजगाव येथील पुरात वाहून मृत्यू झालेल्या तरूणाच्या कुटुंबीयांना बीडच्या जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ४ लाखांची मदत


गेवराई_ भोजगाव येथे दोन दुदैवी घटना घडलेल्या असल्याने बीड जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी आज संत कुटुंबाच्या मदतीला धावले . गावालगत असलेल्या अमृता नदीला पुल नसल्याने त्या पुलावर सुदर्शन संत यांचा नदी पार करत असताना कठड्यावर पाय घसरल्याने त्या नदीच्या पुरात वाहून दुदैवी मृत्यू झाला होता, व त्या आगोदर दोन दिवसांपूर्वी निकिता संत या तरूणीने आत्महत्या केली होती, त्या तरुणीचा शवविच्छेदन करण्यासाठी चक्क बापाला अमृता नदीला पुल नसल्याने ती नदी पार करावी लागली, या घटनेचा महाराष्ट्रभर हळहळ व्यक्त होत आहे, आणि गतवर्षी ही त्याच अमृता नदीवरून प्रवास करताना एक जणाचा मृत्यू झाला होता, अजून ही त्याअमृता नदीवरून ग्रामस्थांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे, अजून किती बळी गेल्यावर हा पुल करण्यात येईल व प्रशासन लोकप्रतिनिधींना जाग येईल असा प्रश्न ग्रामस्थ करित आहेत, त्यामुळे आज बीड चे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी सुदर्शन संत च्या कुटुंबीयांना ४ लाखाची मदत केली आहे, व भोजगाव या गावात ट्रॅक्टर मध्ये प्रवास करून गावाची पहाणी केली, व ग्रामस्थां सोबत सवांद साधला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा