Subscribe Us

header ads

बालेपीर भागातील समाज भवनाची उभारणी करा--- मोहम्मद खमरोद्दीन यांची मागणी

बीड_ बीड बालेपीर विभागात समाज भवन नसल्यामुळे या परिसरातील नागरिकांना समाजिक धार्मिक तसेच इतरही कार्यक्रम खाजगी मंगल कार्यालयात करणे आवाक्या  बाहेरचे आहे ही समस्या पाहता नगर परिषद प्रशासनाने समाज भवनासाठी त्वरित जागा उपलब्ध करून समाज भावनाची उभारणी करण्याची मागणी बीड जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष मोहम्मद खमरोद्दिन यांनी मुख्याधिकारी नगर परिषद बीड यांच्याकडे केली आहे मुख्याधिकारी नगर परिषद यांना दिलेल्या निवेदनात मोहम्मद खमरोद्दीन यांनी म्हटले आहे की बालेपीर विभागात राजीव नगर रोशन पुरा गुलशन नगर काजी नगर अजमेर नगर अमराई बालेपीर आदि परिसरात येत असून या भागात सेवानिवृत्त कष्टकरी समाजसह गोर गरीब नागरिकाचा रहिवास आहे या भागातील गोरगरीब नागरिकाचे हित जोपासले जात नसल्यामुळे खाजगी मंगल कार्यालय कडून मोठी लूट होत असल्याचे दिसून येत उभारल्यास गरीब  नागरिकाचे हित जोपासले जाऊ शकते समाज भवन उभारल्यास गरीब नागरिकासाठी हितकारक ठरणार असून या परिसरातील जनतेस कोणतेही कार्यक्रम घेण्यास सोयीचे होईल या बाबीचा विचार करता नगर परिषद प्रशासनाने समाज भवनासाठी त्वरित जागा उपलब्ध करून समाज भवनाची उभारणी करण्याची मागणी मोहम्मद खमरोद्दीन यांनी केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा