Subscribe Us

header ads

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बीड च्या वतीने भव्य धरणे आंदोलन

बीड (प्रतिनिधी) बीड येथे पप्पुजी कागदे साहेब रिपाइं युवा प्रदेशाध्याक्ष यांच्या मार्गदर्शना खाली बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. रिपाइं जिल्हा सरचिटणीस राजु जोगदंड, मझहर खान, किशन तांगडे, महेश आठवले, प्रभाकर चांदणे, सुभाष तांगडे, या कार्यक्रमाचे आयोजक रिपाइंचे बीड शहर अध्यक्ष अविनाश जोगदंड यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची उंची वाढवुन सुसोभिकरण करणे, पुतळा परीसरातील अतिक्रमण काढणे, या मागणी साठी दि.01/10/2021 रोजी सकाळी 11.00 वा सत्ताधार्याच्या  विरोधात भव्य आंदोलन करण्यात येणार आहे. गेली अनेक वर्षापासून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढवण्या संदर्भात आपणास निदर्शनास आणले आहे. परंतु वेळोवेळी नगर पालीकाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. पुतळ्याच्या परीसरात दारू पिणारे, वेडसर असणारे, भिक मागणारे लोक वावरत असतात, व पुतळ्यावर देखील चढण्याचा प्रयत्न करतात. यापूर्वी अशीच एक घटना घडली आहे, भविष्यातही विटंबना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून बीडशहरातील, नागरिकाची मागणी आहे की, पुतळ्याची ऊंची वाढवून सुशोभीकरण झाले पाहिजे. याअगोदर सुशोभीकरणाच्या नावाखाली काही तरी बोगस कामे करून दिशाभुल करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
तरी मा.साहेबांनी तत्काळ दखल घेऊन पुतळ्याची ऊंची वाढवुन सुशोभीकरण करण्यात यावे व आंबेडकरी जनतेच्या भावनाचा आदर करून कामाला गतीने सुरुवात करण्यात यावी व पुतळा परीसरातील अतिक्रमणे काढून पोलिस चौकी सुरु करून सि.सी.टी.व्ही.कार्यान्वीत करावेत अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बीड शहराच्या वतीने करण्यात येत आहे. तरी बीड शहरातील भिमसैनिकांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे अव्हान अविनाश जोगदंड रिपाइं बीड शहर अध्यक्ष यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा