Subscribe Us

header ads

सोनपेठ बलात्कार प्रकरणी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाचा आक्रोश मोर्चा-- अन्यथा आझाद मैदानावर धडक मारुत - प्रा.पी.टी.चव्हाण.

बीड-/ सोनपेठ तालुक्यातील डिघोळ तांडयावरील बंजारा समाजाच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, गेवराई तालुक्यातील भेंडटाकळी तांड्यावरील ऊसतोड मजुरांचा मुलगा संदिप चव्हाण यांच्या खुन प्रकरणातील सर्व सर्व आरोपींना त्वरित अटक करून कठोर शिक्षा द्यावी, पुणे येरवडा परिसरातील संत सेवालाल महाराज यांच्या मुर्तीची विटंबना करणाऱ्यांचा शोध घेऊन गुन्हा दाखल करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर दि. २९.९.२१ रोजी समस्त गोर बंजारा समाजाच्या वतीने विराट आक्रोश मोर्चा काढण्यात आला.जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे,गृहमंत्री ना.दिलिप वळसे-पाटील यांना निवेदन देण्यात आले.मोर्चात बंजारा परिषद विविध सामाजिक संघटनेचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते महिला युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले.यावेळी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय महासचिव तथा बीडचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा.पी.टी. चव्हाण यांनी सरकारच्या उदासीन वृत्तीवर आक्रमक पणे हल्ला बोल केला.ते आपल्या भाषणात म्हणाले की,खुन,बलात्कार,मुर्तीची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी म्हणून राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीने अनेक ठिकाणी रास्ता रोको, जेलभरो आंदोलन करण्यात आली.उपोषण,निवेदन, निदर्शने करून सरकारचे लक्ष वेधण्यात आले. तरिही वरील गंभीर प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्यात महाराष्ट्र सरकार सपशेल अपयशी ठरले आहे.स्थानिकचे नेते जातीवादी मानसिकतेतून गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत.सरकारचे गुन्हेगारांवर वचक राहिले नाही. त्यामुळे बंजारा समाजाच्या मुली, महिला सुरक्षित राहिल्या नाहीत. वारंवार घडणाऱ्या अशा  घटनांमुळे बंजारा समाजात सरकारच्या विरोधात असंतोष खदखदत आहे. बंजारा समाजाचा अंत न पाहता गुन्हेगारांना कडक शिक्षा द्या,पिडीत मुलीला व कुटुंबियांना न्याय द्या, अन्यथा राज्यातील बंजारा समाज मुंबई येथील आझाद मैदानावर धडक मारेल व होणा-या परिणामाला राज्य सरकार जबाबदार असेल, असा निर्वाणीचा इशारा प्रा.पी.टी.चव्हाण यांनी महाराष्ट्र शासनाला दिला आहे.यावेळी माजी खा.हरिभाऊ राठोड, देवीदास राठोड,अरुणभाऊ चव्हाण, राजपाल राठोड,डॉ. बी.डी.चव्हाण, श्रीमती कलाबाई राठोड, कैलास चव्हाण,साधना राठोड,नंदाताई राठोड यांची भाषणे झाली.या मोर्चात अंकुश चव्हाण, संजय चव्हाण,राजु राठोड, दिगंबर राठोड, पवन जाधव,विकास जाधव,प्रा. कृष्णा राठोड,पवन चव्हाण,विनोद चव्हाण,रोहीदास पवार,मारोती राठोड, पंकजपाल महाराज सह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा