Subscribe Us

header ads

घोडका राजुरीत ६० लाखांचा गुटखा जप्त; दोन आरोपींना अटक

बीड_बीड तालुक्यातील घोडका राजुरी येथे एका गोदामावर छापा टाकून पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या विशेष पथकाने सुमारे ६० लाखांचा गुटखा जप्त केला. १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता ही कारवाई करण्यात आली.बीड- परळी मार्गावरील घोडका राजुरी फाट्यावर एका गोदामात गुटख्याचा मोठा साठा असल्याची माहिती पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून १५ सप्टेंबर रोजी सकाळी पथकप्रमुख सहायक निरीक्षक विलास हजारे व सहकाऱ्यांनी तेथे छापा टाकला. एका ट्रक व एका टेम्पोतून गुटखा भरून नेत असतानाच पथक तेथे धडकले. यावेळी दोन्ही वाहनांच्या चालकांना ताब्यात घेण्यात आले. गुटख्याचा अंदाजे ६० लाख रुपयांचा साठा हस्तगत करण्यात आला. गुटखा, दोन वाहने, दोन आरोपी असा सारा लवाजमा घेऊन पथक पिंपळनेर ठाण्यात पोहोचले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सहायक निरीक्षक विलास हजारे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक