Subscribe Us

header ads

शिक्षणाचा प्रसार खेड्यापर्यंत व्हावा यासाठी गुरुजींनी अनेक शैक्षणिक केंद्र स्थापन केली . _ प्राचार्या डॉ दीपा सावळे

 प्रतिनिधी डॉ शहाजी चंदनशिवे 

परांडा -  दिनांक 7 सप्टेंबर 2021 शिक्षणाचा प्रसार खेड्यापर्यंत व्हावा यासाठी रा गे  शिंदे गुरुजींनी  मराठवाड्यामध्ये अनेक शैक्षणिक केंद्र स्थापन केली असे प्रतिपादन शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयामध्ये श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रा गे  शिंदे गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्राचार्या डॉ दीपा सावळे यांनी व्यक्त केले . शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे  शिंदे महाविद्यालय आणि संत गाडगेबाबा महाविद्यालय परंडा येथे रा गे शिंदे गुरुजी यांची 97 वी जयंती साजरी करण्यात आली . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुनील शिंदे उपस्थित होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्राचार्या  डॉ दीपा सावळे यांची उपस्थिती होती . व्यासपीठावर सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे, आय क्यू ए सी चे चेअरमन डॉ महेशकुमार माने, आणि कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा संजीवन गायकवाड हे उपस्थित होते.पुढे बोलताना प्राचार्या डॉ दिपा सावळे म्हणाल्या की, शिंदे गुरुजी महान विचारवंत होते.त्यांच्यामध्ये नेतृत्वाचे गुण होते ते अभ्यासू होते आणि प्रसिद्धी पासून कोसो दूर होते . गुरुजींनी स्वतःच्या संस्थे बरोबर मराठवाड्यामध्ये अनेक शिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.मराठवाड्यामध्ये शैक्षणिक प्रगती झाली तरच मराठवाडा सुधारेल या उदात्त हेतूने त्यांनी अनेक शैक्षणिक संकुले तयार केली.यावेळी प्रा संजीवन गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय समारोप संस्थेचे अध्यक्ष सुनील नाना शिंदे यांनी केला.कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा संभाजी धनवे यांनी केले तर आभार डॉ विद्याधर नलवडे यांनी मानले.यावेळी महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी सर्वांचा पुष्प देऊन संस्थेच्या आणि महाविद्यालयाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त सत्कार करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा डॉ राहुल देशमुख, प्रा दीपक तोडकरी, प्रा डॉ विद्याधर नलवडे ,प्रा डॉ विशाल जाधव यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी उत्तम माने, हनुमंत मार्तंडे, प्रमोद केजकर यांनी सहकार्य केले . यावेळी वनस्पती शास्त्राचे प्राध्यापक डॉ सचिन चव्हाण यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाचे संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळाल्यामुळे त्यांचाही सत्कार संस्थेचे अध्यक्ष सुनील शिंदे व प्राचार्या डॉ दीपा सावळे यांच्या हस्ते करण्यात आला . कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी covid-19 चे पालन करत उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा