Subscribe Us

header ads

रमाई घरकुल योजनेची ४२४ मंजुर लाभार्थ्यांना चेक वाटप करा अन्यथा न.प. समोर अमरण उपोषण


परळी प्रतिनिधी / दि.०८ माता रमाई घरकुल योजनेतील यादी मंजुर २१६ व २०७ चे चेक वितरित करणे व नंतर व लाभार्थ्यांची नवीन यादी  नविन यादी प्रसिद्ध करावी.  स्वच्छ भारत मिशन अंतर्गत संडास बाथरुमसाठी चे कापण्यात आलेली राशी लाभार्थ्याल परत देण्यात यावी.
भिमनगर जगतकर गल्लीतील परळी वै. किरण तरकसे यांच्या घरासमोरील नाल्या व रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा.या यांचे निवेदन मुख्याधिकारी नगरपरिषद बारावी यांना देण्यात आले,माता रमाई घरकुल योजनेतील यादी २१६ व २०७ म्हणजे एकुन ४२४ मंजुर घरकुल लाभार्थ्यांची यांचे चेक तात्काळ वितरित करण्यात यावे व नंतरची नविन यादी व त्यामधील त्रुट्या प्रसिध्द करण्यात यावी, व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत संडास बाथरुमसाठी चे कापण्यात आलेली रक्कम  लाभार्थ्याला परत देण्यात यावी. भिमनगर जगतकर गल्लीतील किरण तरकसे यांच्या घरासमोरील नाल्या व रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा. हि विनंती अर्जाद्वारे आपणास करण्यात येते. वरिल अर्जाद्वारे कोणतेही कार्यवाही न झाल्यास नगर परिषदेच्या विरोधात आमरण उपोषण करण्यात येईल. असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.किरण तरकसे ,संघपाल आदोडे,राहुल जगतकर,साहेबराव कस्बे,किरण ताटे, दलितानंद शिंदे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा