Subscribe Us

header ads

18 वर्षीय युवकाचा करंट लागून दुर्दैवी मृत्यू


गेवराई_शेतातील शेजार्‍याच्या घरी जेवायला निघालेल्या 18 वर्षीय युवकाचा करंट लागून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गेवराई तालुक्यातील रेवकी येथे शनिवार (ता.2) ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. काळाने डाव साधला आणि शेजारच्या घरी जेवायला निघालेल्या गोकुळचा विद्युत तारेचा करंट लागून जीव गेला.रेवकी गावापासून जवळच असलेल्या शेतातील घरातून गोकुळ शिवाजीराव दहिफळे हा युवक शेजारील शेतकरी बंडू राऊत यांच्या घरी जेवणासाठी निघाला होता, मात्र विद्युत पोलवरून घराकडे जोडण्यात आलेल्या वायरचा करंट लागून तो जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी गेवराई येथील रुग्णालयात घेऊन जात असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने रेवकी गावावर शोककळा पसरली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा