Subscribe Us

header ads

नगरपालिकेने बीड शहरातील नागरिकांच्या कष्टाचा पैसा गुत्तेदार पोचण्यासाठीच वापरला याला जबाबदार कोण? --- अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी बीड


नगरपालिकेने ज्या कामासाठी या बिल्डिंग उभा केल्या त्यासाठी वापर होत नसेल तर शहरांमधील बेरोजगार युवकांना या मधील शॉपिंग कॉम्प्लेक्स उघडण्यासाठी परवानग्या द्याव्यात 

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे
🔶🔷🔶🔷🔶🔷🔶
बीड _बीड आम आदमी पार्टीने बीड शहरातील नगरपालिकेने नागरिकांचा कष्टाचा मेहनतीचा पैसा विकासासाठी न वापरता फक्त आणि फक्त गुत्तेदार पोहोचण्यासाठी वापरण्याचं काम केलेला आहे व त्या जागेवर ती अवाढव्य बिल्डिंग सुभा करून ऐतिहासिक इमारतीच्या समोर पार्किंग मध्ये अतिक्रमण करून तेथे अनधिकृत बांधकाम करण्यात आले त्या बांधकामाचा कसल्याही प्रकारचा जनतेला फायदा नसून घाणीचे साम्राज्य पसरवण्यासाठी होत आहे त्याला जबाबदार असणाऱ्या अधिकारी कर्मचारी व जनप्रतिनिधी यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी बीड शहरामध्ये जुनी भाजी मंडई येथे मच्छी मार्केट च्या नावावर  एक कॉम्प्लेक्स बांधण्यात आलं त्या कॉम्प्लेक्समध्ये तेथे कोणीही वापरत नसून तेथे अन अधिकृत व्यक्तींचा कब्जा असून अवैध धंदे चालतात त्याला कुलूप लावून फक्त घाणीचं साम्राज्य पसरण्याच काम ही नगरपालिका करत आहे त्याच बरोबर सिद्धिविनायक कॉम्प्लेक्समध्ये भाजी मंडी च्या नावावर ती अवाढव्य बिल्डिंग बांधण्यात आली करोडो रुपये खर्च करून ते शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधलं गेलं कॉम्प्लेक्स बांधते वेळेस कधीही व्यापाऱ्यांचा किंवा नागरिकांचा सल्ला घेतला गेला नाही तो बिल्डिंग बांधून कित्येक वर्ष झालं पडून आहे ज्या उद्देशासाठी या बिल्डिंग बांधल्या गेल्या त्याचा वापर होत नसेल तर बीड शहरामध्ये आम-आदमी-पार्टी जे सुशिक्षित बेकार आहेत अशा लोकांना उद्योगधंदे सुरू करण्यासाठी देण्यात यावे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये या मुद्द्यांना घेऊन आम आदमी पार्टी मोठे जनआंदोलन उभं करेन असे आव्हान करत आहे आम आदमी पार्टीच्या आठवडी लाईव्ह शो मध्ये हे जनतेसमोर आणण्याचं काम केलं आहे या वेळेस आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे जिल्हा संघटन मंत्री प्रा .ज्ञानेश्वर राऊत, शहर प्रमुख सय्यद सादेक, जिल्हा सचिव रामधन जमाले, कैलाश चंद, पालीवाल रामभाऊ शेरकर आब्ररार पठाण, इत्यादी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा