Subscribe Us

header ads

जिल्हाधिकारी यांच्याकडून बाबरी मुंडे प्रतिष्ठानचा गौरव; संतोष बहिरे व आरबाज जहागीरदार यांना जिल्हाधिकारी यांनी केले सन्मानीत

 प्रतिनिधी सुशेन बडे
🔶🔷🔶🔷🔶

वडवणी प्रतिनिधी_वडवणी मध्ये  बाबरी मुंडे प्रतिष्ठान वडवणीच्या वतीने कोविड संक्रमण काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबीरांचे आयोजन केले होते.कोविडच्या काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तदान केल्याने शासनाला मोठ्या प्रमाणात मदत झाली. गरजूंना वेळोवेळी रक्त मिळाले म्हणून अनेकांना जिवनदान मिळाले.  त्याच बरोबर बाबरी मुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक जाणिवेतून गरजू रुग्णाची गरज भागविण्यासाठी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिरामध्ये जिल्हा भरामधुन रक्तदात्यांनी रेकॉर्ड ब्रेक रक्तदान केले होते. बाबरी मुंडे प्रतिष्ठान ने केलेल्या या रक्तदान शिबारांची दखल घेऊन शासकीय रक्तसंकलन व रक्तविघटन केंद्र, जिल्हा रुग्णालय बीड यांच्या कडून जिल्हाधिकारी मा.राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते बाबरी मुंडे प्रतिष्ठानचे,सदस्य अरबाज जहागीरदार,व संतोष बहिरे यांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. बाबरी मुंडे प्रतिष्ठानचे काम सर्व सामान्य, गरजूवंत माणसांपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही सतत करत राहू. आणि सर्व सामान्य गरिबांच्या सेवेमध्ये कामं करण्यासाठी आशीच संधी मिळत राहो आशा प्रकारच्या भावना संतोष बहिरे यांनी दै प्रारंभ शी बोलतांना व्याक्त केल्या. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संतोष राऊत, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री बांगर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा