बीड स्पीड न्यूज
बीड_ शहरातील शिंदेनगर भागात रात्री धाडसी चोरी झाली. घरी कोणी नसल्याचा फायदा उचलून चोरट्याने एका घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील नगदी दीड लाख रूपयासह 23 तोळे सोने लंपास केले. घर मालक पहाटे पुण्याहून आल्यानंतर त्यांना आपल्या घरात चोरी झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीसांना कळवण्यात आले. पोलीसांनी चोरीच्या तपासासाठी डॉग स्कॉड, फिंगरप्रिंट पथक,
एलसीबी घटनास्थळी दाखल केली.बीड शहरातील शिंदेनगर येथील रहिवासी धनंजय अरूण जगताप हे काही कामानिमित्त पुण्याला गेले होते. त्यांच्या घराला कुलूप असल्याने याच संधीचा फायदा अज्ञात चोरट्याने उचलून त्यांच्या घरात प्रवेश करत घराचे कुलूप तोडले. घरातील नगदी दीड लाख रूपयासह 23 तोळे सोन्याचे दागिने, 14 जीवंत काडतुसे पळवले. पहाटे धनंजय जगताप हे घरी आले असता त्यांना आपले घर उघडे दिसले व घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या बाबत शिवाजीनगर पोलीसांना कळवले.यानंतर ठाण्याचे एपीआय शेख यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. चोरीच्या तपासासाठी डॉग स्कॉड पथक, एलसीबी, फिंगरप्रिंट पथक दाखल झाले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
0 टिप्पण्या