Subscribe Us

header ads

दुबईत दोन नवीन संघांची घोषणा एक अहमदाबाद तर दुसरा लखनऊ!!

बीड स्पीड न्यूज 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) दोन नवीन संघांची घोषणा केली आहे. पुढील वर्षीच्या हंगामात अहमदाबाद आणि लखनऊ असे दोन संघ सामील होणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संजीव गोयंकाचा आरपीएसजी समूह आणि CVC कॅपिटलने यांनी अदानी आणि मँचेस्टर युनायटेडची मालक असलेल्या ग्लेझरला बाहेर ढकलत दोन नवीन संघांची बोली जिंकली आहे. आरपीएसजी समूह लखनऊ तर CVC कॅपिटल अहमदाबाद संघांचा मालक झाला आहे.
संघांची संख्या वाढल्याने, प्रत्येक संघाला १४ किंवा १८ लीग सामने खेळावे लागतील. प्रत्येक फ्रेंचायझीला घरच्या मैदानावर ७ सामने आणि दूरच्या मैदानावर ७ सामने खेळावे लागतात. सध्या प्रत्येक संघाला प्रत्येकी ७ सामने खेळायला मिळतात. पण संघांच्या वाढीमुळे, जर प्रत्येक संघाला १८ सामने खेळायचे असतील, तर स्पर्धेचा कालावधी वाढेल. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय वेळापत्रकावर परिणाम होईल. लीग सामन्यांची संख्या ७४ किंवा ९४ असू शकते. पुढील हंगामात फक्त ७४ सामने होतील. संघांना २ गटांमध्ये विभागले जाईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा