Subscribe Us

header ads

एसटी प्रवास आज मध्यरात्राीपासून महागणार; १७.५ टक्क्यांची भाडेवाढ

वाढते इंधनाचे दर, थकीत सरकारी अनुदान, प्रवाशांची घटलेली संख्या, कर्मचााऱ्यांबरोबरचे वेतन करार, करोनोमुळे प्रवासी वाहतुकीवर असलेले निर्बंध, टाळेबंदी अशा विविध कारणांमुळे एसटी महामंडळ प्रचंड तोट्यात गेलं आहे. एसटी महामंडळाचा हा तोटा ७ हजार कोटींच्या घरात आहे. उत्पन्न वाढीसाठी निरनिराळे प्रयत्न केले जात असले तरी ते अपुरे पडत आहेत. यामुळेच एसटी महामंडळाने नाईलाजाने तिकीटांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.एसटी महामंडळाने ऐन दिवाळीच्या तोंडावर तिकीटाच्या दरात १७.५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे एसटी प्रवास हा किमान ५ रुपयांनी महागणार आहे. पहिल्या सहा किलोमीटरच्या प्रवासासाठी दरवाढ करण्यात आली नसली तरी त्यानंतरच्या एसटीच्या प्रत्येक टप्प्याला ही दरवाढ लागू असणार आहे. याआधी जून २०१८ मध्ये एसटीने दरवाढ केली होती. आता तब्बल ३ वर्षांनंतर एसटी महामंडळाने दरवाढ केली आहे. एसटीच्या किमान ५ रुपयांच्या या दरवाढीमुळे लांब पल्ल्यांच्या प्रवास हा महागणार असून दोन प्रमुख शहरांतील प्रवासासाठी ५० ते १०० रुपये हे जास्त द्यावे लागणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा