Subscribe Us

header ads

संतोष जगताप खुन प्रकरण;गुन्हे शाखेच्या पथकाने केली दोन आरोपींना अटक

बीड स्पीड न्यूज 

पुणे_उरुळी कांचन येथील संतोष जगताप खून प्रकरणात गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेले दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. आर्थिक कारणामुळे खुन झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. मात्र या खुनामागे आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तसेच या गुन्ह्याचा "मास्टरमाईंड' कोण आहे, याचाही सखोल तपास केला जात असल्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्पष्ट केले. पवन गोरख मिसाळ (वय 29), महादेव बाळासाहेब आदलिंगे (वय 26, दोघेही रा.दत्तवाडी, उरूळी कांचन) अशी अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. पोलिस आयुक्त गुप्ता यांनी पत्रकार परिषदेमध्ये याबाबत माहिती दिली. यावेळी अतिरीक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे उपस्थित होते.
स्वागत खैरे व त्याच्या साथीदारांनी संतोष जगतापवर गोळ्या घालून त्याचा खुन केला. तर खैरे हा जगतापच्या अंगरक्षकाने केलेल्या गोळीबारात ठार झाला. दोघांविरुद्धही लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना इंदापुर येथून अटक केली. खैरे हा सराईत गुन्हेगार होता.त्याच्याविरुद्ध खुन, खुनाच्या प्रयत्नासह गंभीर गुन्हे दाखल होते. तर अटक केलेल्या मिसाळविरुद्ध बेकायदा शस्त्र बाळगणे व अन्य गंभीर गुन्हे आहेत. आदलिंगे हा देखील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्धही गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपींची चौकशी सुरू असून त्यांच्याकडून बरीच माहिती मिळेल, असे गुप्ता यांनी स्पष्ट केले.संतोष जगताप याची स्वतःची टोळी होती. 2011 मध्ये वाळु उपशाच्या कारणावरुन दौंड येथील सख्ख्या चुलत भावांचा खुन झाला होता. त्यामधील आरोपींमध्ये जगताप याच्यासह 35 जणांचा समावेश होता. तसेच 2016 मधील खुनाच्या घटनेतही त्याचा सहभाग होता. त्यामुळे त्याच्या खुनाच्या घटनेला वेगवेगळी कारणे असल्याचे पोकळे यांनी सांगितले.'गोळीबार करून केलेल्या खुनाच्या घटनेतील आरोपींचा तत्काळ शोध घेऊन त्यांना अटक केली. या घटनेमागे वेगवेगळी कारणे असली तरीही त्यामागे आर्थिक कारण असू शकते. या गुन्ह्यात अन्य व्यक्तींचाही सहभाग असू शकतो, तसेच हा गुन्हा कोणी करण्यास सांगितले आहे का ? याचाही पोलिस तपास करीत आहे. अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा