Subscribe Us

header ads

भवानीपूर पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी विजय;भाजपाच्या प्रियंका टिबरेवाल यांचा ५८ हजारांपेक्षा अधिक मतांनी केला पराभव

पश्चिम बंगालमधील भवानीपूर पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी विजयी झाल्या आहेत. पश्चिम बंगालच्या महत्त्वाच्या अशा भवानीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी ३० सप्टेंबर रोजी मतदान पार पडल्यानंतर, सर्वांच्या नजरा आज सकाळी आठ वाजेपासून सुरू असलेल्या मतमोजणीकडे लागल्या होत्या. ममता बॅनर्जी यांनी या पोटनिवडणुकीत भाजपाच्या प्रियंका टिबरेवाल यांचा ५८ हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला.पश्चिम बंगालचं मुख्यमंत्रीपद स्वतःकडे कायम राखण्यासाठी ममता बॅनर्जींना हा विजय आवश्यक होता. कारण, मे महिन्यात नंदीग्राम मतदार संघात झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झालेला होता. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत टीएमसीने एकहाती सत्ता आणलेली जरी असली, तरी देखील ममता बॅनर्जी या स्वतः निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना सहा महिन्याच्या आत कायदेशीरदृष्ट्या निवडून येणं गरजेचं होतं. त्यामुळे या पोटनिवडणुकीला विशेष महत्व होते. भवानीपूर हा ममता बॅनर्जींचा पारिपारीक मतदारसंघ आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा