Subscribe Us

header ads

गेवराई जवळ महिलेचा सांगाडा सापडला;

गेवराई_गेवराई जवळ एका महिलेचा सांगडा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हि घटना धुळे-सोलापूर महामार्गावरील रांजणी जवळील सर्विस रोडच्या एका नाल्यात शनिवारी रात्री उशिरा उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.दरम्यान या महिलेचा खून करुन रांजणी जवळील निर्मनुष्य ठिकाणी हा मृतदेह आणून टाकला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.धुळे-सोलापूर महामार्गावरील गेवराई हद्दीतील रांजणी येथील ग्रामस्थांना परिसरात दुर्गंधी सुटल्याने त्यांनी पाहणी केली असता शनिवारी रात्री गावालगत सर्विस रोडच्या एका नाल्यात मयत महिलेचा सांगडा आढळून आला. यानंतर याची माहिती गेवराई पोलिसांना दिल्यानंतर गेवराईचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेळके, पो. कॉ. खटाणे यांनी घटनास्थळी जावून घटनेचा पंचनामा केला. तसेच सदरील महिलेचा मृतदेह शवविछेदनासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे. दरम्यान सदरील महिलेचा खून करुन रांजणी जवळील निर्मनुष्य ठिकाणी हा मृतदेह आणून टाकला असण्याची शक्यता वर्तविली जात जात असून पोलिस त्या दृष्टीने तपास करत आहेत.रांजणी जवळ महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी माहिती घेतली असता जालना येथून एक महिला आठ दिवसांपूर्वी बेपत्ता झाली असल्याची माहिती मिळाली. सुरुवातीला हा मृतदेह जालना येथील महिलेचा असल्याची शक्यता होती. मात्र संबंधित नातेवाईकांना याबाबत माहिती दिली व ओळख पटवली असता ‘ती’ आमची महिला नसल्याचे मिसिंग दाखल केलेल्या नातेवाईकांनी सांगितले आहे, असे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शेळके यांनी सांगितले. त्यामुळे गेवराई जवळील सापडलेला मृतदेह कोणाचा आहे ? हा खून की अन्य काही प्रकार आहे ? हे पोलिस तपासानंतरच स्पष्ट होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा