Subscribe Us

header ads

वा रे क्षीरसागर तेरा खेल… आधा पाणी आधा तेल बीड नगरीचे हाल कधी संपणार--- रतन गुजर

बीड_गेल्या कित्येक वर्षापासून बीड शहरातील रस्त्याची अवस्था ग्रामीण भागातील रस्त्यांसारखीच करुन टाकली आहे. जे रस्ते पुर्वी होते तेच आजही आहेत. ज्यात काही बदल नाही त्यामुळे जनता पिण्याच्या पाण्यापासून ते चांगले रस्ते कधी मिळतील याच अपेक्षेला धरुन आहे. बीडकरांना मुलभुत सुविधा कधी मिळणार पिण्याचे पाणी 12 दिवसाला तर खराब रस्त्यामुळे नागरिकांचे मणके गेले. कित्येक अपघात झाले परंतु बीडचे नगराध्यक्ष आणि आमदार यांना हे हाल कधी दिसणार असा सवाल शिवसेना जिल्हा संघटक रतन गुजर यांनी केला आहे. तसेच याबाबत जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे मार्फत शहराचा आढावा घेवून महाराष्ट्राचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती देणार असल्याचे त्यांनी पत्रकाद्वारे सांगितले आहे.पुढे दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,  बीड शहरामध्ये सध्याची परिस्थिती नाजूक आहे पाऊस झाला की लोकांना रोडवर येण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते माननीय आमदार साहेब यांनी या धानोरा रोडच्या पश्चिमेस असलेले गोविंदनगर रस्त्याच्या आश्वासन दिले होते व काही दिवसांनी माननीय नगराध्यक्ष यांनी या रस्त्याचे उद्घाटन ही केले परंतु त्याला अजून मुहूर्त लागलेला नाही मग या लोकांनी काय पाप केले की त्यांना हे हाल-अपेष्टा सोसावे लागतात. एक क्षीरसागर सांगतात की ते आपले लोकं नाहीत तर  दुसरे क्षीरसागर म्हणतात की आपल्याला त्या ठिकाणाहून लीड नाही जनतेने तर तुम्हाला मतदान केले आहे मग जनतेचे काय चुकले त्यांच्या पदरी कायम निराशाच का? तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांनी शहराचा आढावा घेतला व त्यांनी सर्व पदाधिकार्‍यांना सांगितले सर्व भागाची पाहणी करून घ्या लवकरच नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहे त्यामुळे शिवसेना जिल्हा संघटक रतन गुजर यांनी पाहणी केली सर्व जनतेला एकत्र केले व सर्व भागाची पाहणी करायला सुरुवात केली या जनतेचे हाल पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी येत होते. कोणाच्या घरात पाणी घुसले आहे तर कोणाच्या दारात पाणी साचले आहेत. त्यामुळे शिवसेना जिल्हा संघटक रतन गुजर यांनी या भागातील लोकांना आश्वासन दिली आपली समस्या लवकरच दूर करू शिवसेना आपल्या पाठीशी खंबीर आहे व जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे यांना भेटून आपली समस्या सोडवू असे आश्वासन यावेळी जिल्हा संघटक रतन गुजर यांनी दिली याप्रसंगी या भागातील लोक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक