Subscribe Us

header ads

सकाळी गेवराईजवळील रांजणी याठिकाणी आढळून आला होता सांगडा ; त्या' महिलेची ओळख पटली

गेवराई_ राष्ट्रीय महामार्गवरील  रांजणी जवळ  एका नालीत  मानवी सांगडा आढळून  आल्याने एकच खळबळ उडाली होती.  गेवराई पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने  फिरवत तो सांगडा  महिलेचा असून तिची ओळख देखील पटवली आहे. खून करून त्याचा मृतदेह लपविण्यात आल्याचा पोलिसांचा अंदाज असून या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे.  राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या रांजणी जवळील एका नालीत रविवार (दि.3)  सकाळी पोलिसांना मानवी सांगडा आढळुन  आला होता.  गेवराई पोलीस ठाण्याचे जमादार  ए. बी शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली.  नंतर गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तो सांगडा महिलेचा असल्याचे स्पष्ट केले. त्या सांगडा शेजारी साडी, कानातील, पैजन या वस्तू वरून तिची ओळख पटली असून राधा माणिक गायकवाड (वय 34) रा. इंदेवादी जि. जालना असे त्या महिलेचे नाव आहे.  गेवराई पोलिसांनी जालना पोलिसांशी संपर्क करत  मृत्यूदेहाची ओळख पटविली.  दरम्यान आठ ते दहा दिवसांपूर्वी तिचा खून करण्यात आला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. डीएनए अहवाल येणे बाकी आहे.  यानंतर खरे कारण समोर येईल असे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काळे यांनी म्हटले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा