Subscribe Us

header ads

निळकंठेश्वर महादेव मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सर्वांनी हातभार लावणे गरजेचे - अरुण नाना डाके नामदेवराव दुधाळ यांच्या पुढाकारातून जीर्णोद्धारासाठी तरुण सरसावले



बीड प्रतिनिधी_बिंदुसरा नदीच्या तीरावर खासबाग देवीच्या समोर पुरातन असलेल्या ऐतिहासिक निळकंठेश्वर महादेव मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आता सर्वांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे. पुरातन मंदिरांचे महात्म्य टिकवणे आणि वाढवणे आपले कर्तव्य असल्याचे प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हभप अरुण नाना डाके यांनी व्यक्त केले.माजी नगरसेवक ज्येष्ठ मार्गदर्शक नामदेवराव दुधाळ यांच्या पुढाकारातून ऐतिहासिक परंपरा असलेल्या निळकंठेश्वर महादेव मंदिराच्या जीर्णोद्धारास प्रारंभ झाला आहे. निळकंठेश्वर मंदिर ट्रस्टच्यावतीने मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी व्यापक बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला माजी सभापती अरुण नाना डाके यांच्यासह सावता परिषदेचे संस्थापक कल्याण काका आखाडे, पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, किशोर राऊत,सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेते अशोक(दादा)ढोले पाटील,एम एस कन्ट्रक्शनचे संचालक सातिराम ढोले,हानुमंत पवार शेषराव घोडके, सखाराम पवार, रामचंद्र ढोले,अशोक शेळके , पत्रकार रमाकांत गायकवाड ट्रस्टचे अध्यक्ष संदीप होटकर पुजारी ज्ञानदेव ढोले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. प्रमुख अतिथींचे शाल, श्रीफळ, पुष्पहार अर्पण करून मंदिर ट्रस्टच्या वतीने स्वागत करण्यात आले.यावेळी जीर्णोद्धारासाठी पुढाकार घेतलेले प्रमुख मार्गदर्शक नामदेवराव दुधाळ म्हणाले, या मंदिराची पाच एकर जागा पुन्हा एकदा मंदिराच्या नावे करण्यासाठी आणि अद्यावत मंदिर उभारण्यासाठी मोठ्या आर्थिक तरतुदीची गरज आहे. यासाठी सर्वांनी सढळ हाताने मदत करणे गरजेचे आहे. त्याच बरोबर या पुरातन मंदिराचे पावित्र्य अबाधित राहण्यासाठी सर्वांनीच सहकार्य करणे गरजेचे आहे.याप्रसंगी कल्याणराव आखाडे म्हणाले, बीड शहरात 12 महादेवाचे पुरातन मंदिर आहेत.बीड शहरासाठी हे बारा ज्योतिर्लिंगच म्हणावे लागतील. या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सर्वांनी एकत्रित लढा उभारावा त्यास माझे पूर्णपणे पाठबळ राहील. याप्रसंगी किशोर राऊत,पत्रकार वैभव स्वामी, रमाकांत गायकवाड आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. सदरील निळकंठेश्वर मंदिर हे ऐतिहासिक असून याचा शिलालेखामध्ये उल्लेख झालेला आहे. अशा या पावन मंदिर स्थळाचा विकास करण्यासाठी दानशूरांनी ट्रस्टचे ज्येष्ठ मार्गदर्शक नामदेवराव दुधाळ मोबाईल नंबर 97 67 19 97 75, ट्रस्टचे अध्यक्ष संदीप होटकर 92 25 11 97 11, विश्वस्त बंडू ढगे 98 60 81 49 51 आणि रामचंद्र ढोले 94 20 01 36 97 या मोबाईलवर संपर्क करून सढळ हाताने मदत करावी असे आवाहन निळकंठेश्वर महादेव मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा