Subscribe Us

header ads

आरंभ प्रतिष्ठान च्या वतीने 'महिला लघु उद्योग 'सुरु करण्याची मोहीम.


(वृत्तसंकलनः मुक्त पत्रकार  आत्माराम ढेकळे,पुणे)


आरंभ प्रतिष्ठान*  महाराष्ट्र राज्य  या सामाजिक स्वंयसेवी संस्थेने "महिला सक्षमीकरण" हा मुद्दा हाती घेऊन भारतामध्ये 'महिला लघु उद्योग'सुरु करण्याची  मोहीम हाती घेतली आहे.त्याची सुरुवात मुंबई विभागातील पालघर जिल्ह्यातील तालुका वाडा मधील गांध्रे या गावात सुरु करण्यात आली आहे.यासाठी येथील प्रतिष्ठित व्यक्ती प्रल्हाद दादा ठाकरे,चिखले गावातील संतोष पाटील यांचा खुप प्रतिसाद मिळाला.'आरंभ प्रतिष्ठान' च्या कार्यकारिणीवर  मिठाराम भोईर,राज पाटील,जयेश भोईर तसेच अन्य पदाधिकारी यांची निवड करण्यात आली आहे. "आरंभ प्रतिष्ठान"महाराष्ट्र राज्य ची 'लघु उद्योग 'संदर्भात एक बैठक संपन्न झाली. याप्रसंगी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोष टाक ,उपाध्यक्ष रोहित कुमार प्रजापती,  प्रदेश अध्यक्षा माधुरीताई उदावंत,कोषाध्यक्ष मिठाराम भोईर,अमोल भागवतकर,वाडा अध्यक्ष राज पाटील,जयेश भोईर,प्रलाद ठाकरे,कल्पेश ठाकरे ,संतोष पाटील  तसेच सुमारे १००महिलांची उपस्थिती होती.
      "आरंभ प्रतिष्ठान"महाराष्ट्र राज्य च्या वतीने
  प्रामुख्याने समाजातील गोर गरीब,निराधार व अनाथ यांना मदत,सहकार्य सातत्याने करीत असल्यामुळे आपल्या कार्याचा सामाजिक ठसा  उमटवला आहे.प्रतिष्ठान विविध क्षेत्रात जोमाने कार्यरत आहे.या प्रतिष्ठानचे संस्थापक  राष्ट्रीय अध्यक्ष संतोष टाक  व संपुर्ण सर्व पदाधिकारी भारतामध्ये औद्योगिक ,वैद्यकीय ,अनाथ,विधवा ,निराधार ,गरजु ,बेरोजगार या सर्वांसाठी विविध माध्यमातून दिवस रात्र लागेल ती मदत 'आरंभ प्रतिष्ठान' च्या वतीने समाजामध्ये केली जाते.त्याचबरोबर महिलांवर होणारे अत्याचार थांबविण्यासाठी रणरागिणी कक्षाची स्थापना करण्यात आली असुन त्यांना न्याय मिळवुन देण्याचे कार्य रणरागिणी टीम व प्रतिष्ठानच्या सहकार्याने होत आहे. कौटंबिक वाद असो वा अन्य कोणतीही समस्या असो ते सोडविण्यासाठी कार्य  केले जाते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा